प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपानशैक्षणिक

शालेय विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या पोषण आहार योजनेतील तांदळाची परस्पर विक्री.

शालेय विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या पोषण आहार योजनेतील तांदळाची परस्पर विक्री केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.धायरी भागात संस्कार महिला मंडळाचे स्वयंपाक घर आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेअंतर्गत पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. शासकीय योजनेतील आठ लाख ९६ हजार २०० रुपयांचा तांदूळ सानप आणि गोयेकर यांच्याकडे देण्यात आला होता. दोघेजण टेम्पोतून शासकीय योजनेतील तांदूळ खुल्या बाजारात विक्री करण्यासाठी घेऊन निघाले होते. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर दोघांना सापळा लावून पकडण्यात आले.
याप्रकरणी अजिनाथ सदाशिव सानप (वय ४१ ,रा. सरनौबतवाडी, कोल्हापूर) , रामराज उर्फ रामभाऊ मोताीराम गोयेकर (वय ३०, रा. काळेपडळ, हडपसर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संतोष रामदास फाटके (वय ३०, रा. मांजरी) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्हे शाखेच्या युनिट एकचे सहायक निरीक्षक आशिष कवठेकर तपास करत आहेत.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!