मुख्यपानशैक्षणिकसामाजिक / सांस्कृतिक

लेकीला प्रोत्साहन देण्यासाठी डॉक्टर वडिलांनी ५० व्या वर्षी दिली NEET परीक्षा.

लेकीला प्रोत्साहन देण्यासाठी वडिलांनीही दिली परीक्षा.
बाप हा आपल्या मुलीसाठी काहीही करू शकतो. याचंच एक उदाहरण सध्या समोर आलं आहे. शिक्षण घेण्यासाठी कोणत्याही वयाची मर्यादा नसते, NEET ही देशातील सर्वात कठीण स्पर्धा परीक्षांपैकी एक, मात्र खास आपल्या लाडक्या लेकीला प्रोत्साहन देण्यासाठी डॉ.खेतान यांनी NEET परीक्षेचा अर्ज भरला होता. प्रकाश खेतान हे प्रयागराजचे प्रसिद्ध डॉक्टर आहेत. प्रकाश खेतान यांची १८ वर्षांची मुलगी मिताली हिलाही त्यांच्याप्रमाणेच डॉक्टर बनायचे आहे. डॉक्टर वडिलांनी आपल्या मुलीला वैद्यकीय प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रवृत्त करण्याचा निर्णय घेतला. डॉ. प्रकाश खेतान यांनी ठरवले की, ते स्वतःही या परीक्षेचा फॉर्म भरतील. याप्रमाणे त्यांनी वयाच्या ५० वर्षी NEET साठी अर्ज केला. त्यांनी अनेक दशकांनंतर पुन्हा वैद्यकीय पुस्तके वाचली आणि तयारी केली. दरम्यान, परीक्षेबाबतही ते एकमेकांशी चर्चा करत असायचे. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर परीक्षा दिली. निकाल लागला आणि एका टक्क्याने मुलीनं वडिलांपेक्षा पुढे गेली, मुलीला ९० टक्के गुण मिळाले तर डॉ. प्रकाश खेतान यांना ८९ टक्के गुण मिळाले. असं असलं तरी शेवटी बापच जिंकला.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!