महाराष्ट्रमुख्यपान

चार विषयात नापास झाल्यामुळे नैराश्यात गेलेल्या १८ वर्षीय विद्यार्थिनीने विष प्राशन करून केली आत्महत्या.

शांतीनगर परीसरात निधी नावाची मुलगी बारावीत शिकत होती. पहिल्या प्रयत्नात ती नापास झाली होती. तिने पुन्हा पेपर दिले. मात्र, त्यातही ती चार विषयात नापास झाली. त्यामुळे आई-वडिल आरडओरड करतील, अशी भीती तिच्या मनात होती. नापास झाल्यामुळे नैराश्यात गेलेल्या १८ वर्षीय विद्यार्थिनीने विष प्राशन करून आत्महत्या केली. तिने निकालाबाबत कुणालाही सांगितले नव्हते . तिने हळूच आईला चार विषयात नापास झाल्याची माहिती दिली. तेव्हापासून ती नैराश्यात गेली होती . तिला कुटुंबियांसमोर वावरताना असहज वाटत होते. १४ ऑक्टोबरला दुपारी १२ वाजता तिने घरात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
तिच्या तोंडातून फेस निघत असल्यामुळे कुटुंबियांच्या प्रकार लक्षात आला. कुटुंबियांनी निधीला मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान निधीचा गुरुवारी दुपारी मृत्यू झाला. या प्रकरणी शांतीनगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!