महाराष्ट्रमुख्यपान

वाढदिवसाचा खर्च टाळून मूकबधिर व अनाथ मुलांना शालेय उपयोगी वस्तुचे वाटप

मुकबधिर व अनाथ मुलांना करण्यात आले अन्नदान, यूनिटी मल्टीकॉन कंपनीने समाजात आदर्श निर्माण केला .———————————————–नळदुर्ग ता तुळजापूर येथे जिल्हा परिषद कन्या प्रशाला , जिल्हा परिषद प्रशाला मुलांची , जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा , जिल्हा परिषद उर्दू शाळा , धरित्री विद्यालय [ आपलं घर ] मूकबधिर सह इतर शाळांना एकत्र करून नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यातील युनिटी मल्टीकॉन कंपनीचे कार्यकारी संचालक तथा मुख्य प्रवर्तक कफिल मौलवी यांचा वाढदिवसाचा संपूर्ण खर्च टाळून नळदुर्ग येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी वस्तूचे आणी खाऊचे वाटप करण्यात आले याचबरोबर मूकबधिर अपंग शाळा आपलं घर येथील अनाथ मुलांना अन्नदान करून एक वेगळा अनोखा उपक्रम राबवुन समाजात एक आदर्श निर्माण केला आहे या उपक्रमामुळे नळदुर्ग शहरामधील विद्यार्थ्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते .अनेक वर्षापासुन नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ला यूनिटी मल्टीकॉन्स कंपनीने हा किल्ला प्रशासनाकडून चालवायला घेतला आसुन दररोज गोरगरिबांना हाताला चांगलेच काम लागले आसून युनिटी मल्टीकॉन्स कंपनीचे मुख्य प्रवर्तक तथा कार्यकारी संचालक कफिल मौलवी यांचा वाढदिवसाचा चक्क खर्च टाळुन नळदुर्ग मध्ये खुप मोठी समाज सेवा केल्याचे दिसुन आले या उपक्रमामुळे कफिल मौलवीचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतक केले आहे .कार्यक्रमाचे प्रास्ताविक आयोजक तथा जन सपर्क अधिकारी विनायक अहंकारी यानी केले. यूनिटी मल्टीकॉन्स मुख्य प्रवर्तक तथा कार्यकारी संचालक कफिल मौलवी यांच्या वाढदिवसाचा खर्च टाळून सदरील मुलांना शालेय उपयोगी वाटप व अन्नदान करण्यात आले यावेळी नळदुर्ग नगरीचे माजी नगरसेवक कमलाकर चव्हाण , ज्येष्ठ पत्रकार विलास येडगे , माजी नगराध्यक्ष मुस्ताक कुरेशी , माजी नगराध्यक्ष नितीन कासार , माजी नगरसेवक सुधीर भैया हजारे , नळदुर्ग शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे माजी नगरसेवक बसवराज धरणे सामाजिक कार्यकर्ते संजय विठ्ठल जाधव माजी तालुका शिवसेना उपप्रमुख सरदारसिंग ठाकूर , शहर प्रमुख संतोष पुदाले , पत्रकार भगवंत सुरवसे , पत्रकार दादासाहेब बनसोडे, पत्रकार लतीफ शेख , पत्रकारमित्र अमर भाळे , पत्रकार शिवाजी नाईक , सामाजिक कार्यकर्ते उमेश जाधव , बंडू कसेकर , कॉन्स्टेबल ठाकूर आधी जणांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला यावेळी जिल्हा परिषदेचे शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यक्रमाचेआयोजन युनिटी मल्टीकॉनचे जनसंपर्क अधिकारी तथा माजी नगरसेवक विनायक अहंकारी यांनी केले होते यावेळी युनिटी मल्टीकॉनचे मॅनेजर जुबेर काझी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला . यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी खूप मोठ्या संख्येने उपस्थित होते .

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!