समता सैनिक दलाचे डिव्हीजन ऑफिसर आयु. कुणाल दहीवले सर यांची मेजर पदी निवड..

टीम जागृत भारत च्या वतीने अनेक मंगल कामना..

जालना प्रतिनिधी: जालना येथील भारतीय बौद्ध महासभा जिल्हा संस्कार उपाध्यक्ष आयु. कुणाल दहिवले सर हे सन २०१९ पासून धम्मसंस्थेत कार्यरत आहेत. सन २०२२ पासून समता सैनिक दल जालना चे डिव्हीजन ऑफिसर या पदावर कर्तव्य बजावत आहेत.
जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात कोठेही शिबिर घेण्यास तत्पर असलेल्या दहिवले सरांच्या हातून आजवर कित्येक सैनिक तयार झालेले आहेत. महिला सैनिकांचे शिबिरे आयोजित करून दहीवले सरांनी समता सैनिक दलाची महिला विंग सुद्धा भक्कम उभी केलेली आहे.
त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत धम्म संस्थेने नुकतीच त्यांची पदोन्नती करत त्यांना मेजर या पदावर नियुक्ती दिलेली आहे.
दहीवले सरांच्या पदोन्नती बाबत सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे व मंगल कामनांचा वर्षाव होत आहे. दहिवले सरांनी त्यांच्या कार्यकाळात जालना जिल्हा व इतर जिल्ह्यात समता सैनिक दलाचे प्रशिक्षण शिबिर मोठ्या संख्येने आयोजित करून सैनिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण केले होते. शिबिरात सहभागी होत असत.
अथक परिश्रम घेत जिल्ह्यात समता सैनिक दल भक्कम करत असतात मिळालेल्या पदोन्नतीचे श्रेय मात्र त्यांनी जिल्हाध्यक्ष आयु. महेंद्र बनकर व सरचिटणीस आयु. राजेश सदावर्ते यांना दिले आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत