नळदुर्ग येथील सिद्धार्थ शिवाजी बनसोडे यांचे UPSC परिक्षेत घवघवीत यश

देशात ९६ वा क्रमांक पटकविला
सर्वत्र अभिनंदन व कौतुकांचा वर्षाव
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
नळदुर्ग येथील फुले शाहु आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते तथा कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा शिवाजी गिरजाप्पा बनसोडे व आदर्श विद्यालय सोलापूर येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापिका निनू शिवाजी बनसोडे – माने यांचे चिरंजीव सिद्धार्थ शिवाजी बनसोडे हे नुकत्याच पार पडलेल्या संघ लोकसेवा आयोग युपीएससी परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करून देशात ९६ वा येण्याचा मान मिळविलेला आहे .
नुकत्याच झालेल्या संघ लोकसेवा आयोगाच्या यू पी एस सी इंजिनियरिंग सर्व्हिसेस परिक्षे मध्ये घवघवीत यश संपादन केले आसुन देशात ९६ वा क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत .
सिध्दार्थ बनसोडे यांचे प्राथमिक शिक्षण सिध्देश्वर इंग्लीश मेडीयम स्कुल येथे झाले आसुन त्यांचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्यूसन कॉलेज पुणे येथे झाले आहे . तर पुढील इंजिनियरिंग शिक्षण हे मुंबई येथील के जे सोमय्या अभियंत्रकी महविद्यालयातुन पार पडले आहे .
ते सध्या चन्नई येथे DRDO मध्ये शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत आहेत . ही नोकरी संभाळत त्यानी संघ लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत देशात ९६ व्या क्रमांकने उतिर्ण झाले आहेत त्यांच्या या यशाबद्दल रिपाईच जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे , प्रमोद कांबळे बापू दुरुगकर , नवनाथ गायकवाड , बौध्दाचार्य दादासाहेब बनसोडे पपू सुरवसे , योगेश सुरवसे , सोनू बनसोडे सह अनेक कार्यकर्त्यानी सर्वस्तरातुन अभिनंदन व कौतुक करत आहेत .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत