नवरंग उधळणा-या आमच्या महिलांसाठी

ठिगळाचे लुगडे
रात्रीच्या वेळी रमाई कंदिलाच्या प्रकाशात जीर्ण झालेल्या, फाटलेल्या* लुगड्याला हातानेच ठिगळ जोडीत होती .
बाबासाहेबांनी पुस्तकातून लक्ष काढून वरती पाहिले तर रामू कंदिलाच्या प्रकाशात आपल्या फाटलेल्या लुगड्याला ठिगळ लावताना दिसली , तेव्हा बाबासाहेब डोळ्यात पाणी आणत रमाईला म्हणले , ‘रामू उद्याच बाजारातून तुझ्यासाठी नवं लुगडं घेऊन येऊया ..
रमाई म्हणाली इथं तुमच्या शिक्षणासाठी मी पै-पै जोडतीया ……अन् तुम्ही ही लै मन लावून शिकतासा ….जातिल हे दिवस थोडं सहन कराव लागेल आपल्याला , ह्यो समाज बदलायचाय ना तुम्हाला ….ह्यो समाज आपलं पोरं आहे जनू ,आपण लै मेहनत घेऊ….
बाबासाहेब डोळ्यावरील चष्मा काढून म्हणले , रामू तुझे हे फाटलेले लुगडं आपल्या दीन दुबळ्या समाजासाठी , या देशासाठी मायेची सावली होईल बघ …..
रमाईच ठिगळ लावून झाल्यावर त्या बाबासाहेबांना म्हणतात साहेब ठिगळ किती छान आलं .. ..
तेव्हा बाबासाहेबांच्या डोळ्यात आभाळ भरून आले……..
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत