प.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण

ससून रुग्णालयातून फरार झालेला ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला अखेर चेन्नईमधून अटक.

पुण्यातील ससून रुग्णालय परिसरात २ कोटी रुपयांचे ड्र्ग्ज सापडले होते.याप्रकरणी पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात एनडीपीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून यातील दोघांना उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील बारंबाकी इथून दोघांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांच्या नाकावर टिच्चून ललित पाटील फरार झाल्याने पोलिस यंत्रणेवर ताशेरे ओढले जात होते. पुण्यातील ससून रुग्णालयातून फाररा झालेला ड्रग्ज माफीया ललित पाटील याचा शोधात पोलीसांची दहा पथके तयार करण्यात आली होती. अखेर रात्री चेन्नई येथे लपून बसलेल्या पाटील याला अटक करण्यात आलं आहे. यानंतर ललित पाटील याला पुण्यात आणलं जाणार असून त्यानंतर कोर्टात सादर केलं जाईल.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!