वाद विवाद करून आम्हाला कुणाच्या ताटातलं आरक्षण नको प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया आम्हाला वेगळा आरक्षण हवं ही मराठा समाजाची भूमिका.

मुंबई – मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर जाणीवपूर्वक टीका होत असून, त्यांना मुद्दामहून लक्ष्य केले जात आहे. शरद पवार गटाकडून हा असा प्रकार केला जात असल्याचा आरोप भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर यांनी आज येथे केला. सराटी येथील सभेत जरांगे-पाटील यांनी फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेला दरेकर प्रतिउत्तर देत होते. फडणवीस यांनी मराठा समाजाला आरक्षण दिले होते. ते न्यायालयातही टिकले होते. मात्र नंतर आलेल्या महाविकास आघाडी सरकारने दुर्लक्ष केल्याने ते आरक्षण न्यायालयात रद्दबातल झाले. मराठा आरक्षण देण्यात नारायण राणे, देवेंद्र फडणवीस व आता एकनाथ शिंदे यांचाही मोठा वाटा आहे. तरीही मुद्दाम फडणवीस यांना टार्गेट केले जात असून यात राजकीय वास येत आहे असेही दरेकर म्हणाले. जरांगे यांच्या टिकेमागे बोलवता धनी कोण आहे याची शंका असल्याचेही दरेकर म्हणाले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत