महाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

शाहूवाडीत भारतीय दलित महासंघाचे ठिय्या आंदोलन

शाहूवाडी : शिक्षणाचे खाजगीकरण करण्याचा घटनाबाह्य निर्णय राज्य सरकारने मागे घ्यावा या मागणीसाठी सोमवारी (दि, ९ रोजी) भारतीय दलित महासंघाच्यावतीने शाहूवाडी तहसीलदार कार्यालयासमोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन करण्यात आले कोल्हापूर जिल्हा परिषदच्या २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून अशा शाळा संघटित करून सरकारने समूह शाळा उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला सर्वच स्तरातून विरोध होत आहे. भारतीय दलित महासंघाने देखील सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला आहे. सोमवारी अध्यक्ष श्रीकांत कांबळे यांच्या नेतृत्वाखाली या निर्णयाच्या विरोधात शाहूवाडी तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!