आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सोलापूरची सुकन्या साक्षी हिला 50 हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरव.
सोलापूर : कॅनडा येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सोलापूरची सुकन्या साक्षी सुरेश तोरणगी हिला महापालिकेच्या वतीने आयुक्त शितल तेली – उगले यांच्या हस्ते प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपयांचा धनादेश देऊन गौरव करण्यात आला.
श्री सिद्धेश्वर बालक मंदिर शाळेतील माजी विद्यार्थिनी कराटे चॅम्पियन साक्षी सुरेश तोरणगी ही आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यास कॅनडा या देशांमध्ये खेळण्यासाठी दि. 15 ऑक्टोबर 2023 रोजी जाणार आहे. तिला आर्थिक सहाय्य म्हणून सोलापूर महानगरपालिका महिला व बालकल्याण विभागाचे वतीने आर्थिक सहाय्य मंजूर करून सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेली- उगले यांच्या हस्ते सत्कार करून ५० हजार रुपयांचा धनादेश सुपुर्द करण्यात आला. तिला प्रोत्साहित करण्यात आले. स्पर्धेत यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी महिला व बालकल्याण अधिकारी विठ्ठल कस्तुरे, शोभा तोरणगी, सुरेश तोरणगी, वर्षाराणी कस्तुरे उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत