सिक्कीममध्ये तिस्ता नदी खवळली, तैनात असलेले २३ जवान बेपत्ता; सरकारकडून हायअलर्ट जारी

सिक्कीममध्ये रात्रीपासून मुसळधार पाऊस पडत आहे. उत्तर सिक्कीममधील ल्होनाक सरोवरावर झालेल्या ढगफुटीमुळे तिस्ता नदीची पाण्याची पातळी वाढली.
सिक्कीममध्ये अचानक ढगफुटी झाली आहे. त्यामुळे उत्तर सिक्किममधील तिस्ता नदीला पूर आल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, येथे तैनात करण्यात आलेले २३ लष्करी जवान बेपत्ता असल्याचीही माहिती आहे. त्यांना शोधण्यासाठी बचावकार्य सुरू असून मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
“खोऱ्यातील काही लष्करी आस्थापना प्रभावित झाल्या आहेत. २३ लष्करी जवान बेपत्ता असल्याची माहिती मिळाली असून काही वाहने गाळाखाली दबल्याची माहिती आहे. चुंगथांग धरणातून पाणी सोडण्यात आल्याने १५-२० फूट उंचीपर्यंत पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाली. त्यामुळे पूर आला”, अशी माहिती एका लष्कराच्या ईस्टर्न कमांड निवेदनाद्वारे देण्यात आली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत