दिन विशेषदेशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीशआयु. भूषण गवई साहेबांना हार्दिक शुभेच्छा .!

” तुझ्या संविधानाच्या छायेत.!”

न भूतो, न भविष्यती,
असा देह भूमीवर अवतरला,
त्याने स्वकर्तृत्वावर,
माणसातला देव दाखवला.!

लाखो, करोडों, धुत्कारलेल्या, नाकारलेल्या, पिचलेल्या,
दिन दलितांच्या,
हेतुपुरस्सर, अडवून ठेवलेल्या,
वाटा उत्कर्षाच्या,
मोकळ्या करून दिल्या.!

जावून बाबा, काळ लोटला,
दिवसागणिक, कर्तुत्व तयांचे,
अधिकाधिक, उजळत जाई,
ते दीपस्तंभ होई ,
विश्वाला कवेत घेई.!

वाटचाल, प्रगतीची करताहेत,
वेशीबाहेर टाकलेले ,
मानवी हक्क नाकारलेले,
तुझ्या संविधानाच्या छायेत,
झालेत कुणी राष्ट्रपती,
तर कुणी बसलेत,
देशाच्या सर्वोच्च न्यायालयातील,
सरन्यायाधीश पदाच्या खुर्चीत.!

सरन्यायाधीश पदाच्या खुर्चीत.!!

सरन्यायाधीश पदाच्या खुर्चीत.!!!

अरुण निकम,
9323349487.
मुंबई.
17/05/2025.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!