
नाशिक – मोबाईल आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक झाला आहे. त्यामुळे आपण अगदी सर्वठिकाणी मोबाईल आपल्यासोबतच ठेवतो. अगदी झोपताना देखील आपण मोबाईलला आपल्या जवळच ठेवतो. मात्र असं करणं धोकादायक आहे, असा इशारा वारंवार देण्यात येतो. त्यातच आता मोबाईलचा भीषण स्फोट झाल्याचं वृत्त नाशिकमधून समोर आलं आहे.
नाशिकच्या उत्तम नगर मध्ये मोबाईलचा मोठा स्फोट झाला आङे. मोबाईलच्या स्फोटामुळे घरातील काचा फुटल्याचं समोर आलं आहे. सकाळी सहा वाजेच्या सुमारास ही घडली घटना. मोबाईल स्फोटामुळे तीन जण जखमी झाले. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मोबाईल स्फोट एवढा भीषण होता की, आजूबाजूचा घरांच्या देखील फुटल्या काचा फुटल्या आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत