एकलव्य विद्या संकुल भटके विमुक्त विकास मुलींची निवासी शाळेस पिठाची भेट

जनशुभदा फाऊंडेशनचा अनोखा उपक्रम सोमनाथ गुडडे यांचे सर्वत्र कौतुक
नळदुर्ग
दादासाहेब बनसोडे
एकलव्य विद्या संकुल भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान निवासी शाळा या मुलींच्या प्रशालेस सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ गुड्डे यांच्या वाढदिवसाचा खर्च न करता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शैक्षणिक विकासासाठी आवश्यक तो प्रयत्न करत दळण वळणाच्या गोष्ठी समोर ठेवत शाळेस एक जनशुभदा फाऊंडेशनच्या वतीने ३ फ्रिज पिठाची गिरणी व ५० विद्यार्थाना शालेयपोयगी वस्तुचे वाटप करण्यात आले .
समाज व्यवस्थेपासून जी अनेक वर्ष लोक समाजाच्या बाहेर राहतात आसे विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे असते त्यामुळे सोमनाथ गुड्डे यांनी विनाकारण वाढदिवसाला खर्च करण्यापेक्षा अनेक जाती, उपजातींतील मुला यमगरवाडी येथील मुलींची निवासी शाळा या शाळेस जनशुभदा फाउंडेशन व शिवसेनेच्या माध्यमातून थ्री फेज पिठाची गिरणी व ५० विद्यार्थ्यांसाठी वह्या पुस्तके देण्यात आले.
एकलव्य उद्या संकुल यांचे अनेक वैशिष्ट्ये समोर येतात तेथील विद्यार्थ्यांची शिस्त त्यांची गुणवत्ता वाढीस अनण्यासाठी शिक्षक प्रामाणिक प्रयत्न करतात आणि त्या संकुलातून घडणारे असंख्य गुणवंत विद्यार्थी घडतात आशा प्रकारची माहिती कोंडीबा देवकर यांनी दिली अत्यंत तळमळीने आणि मुद्देसिद्ध माहिती आम्हा सर्वांना दिली त्यामुळे
त्या शाळेच्या विद्यार्थी शिक्षकाचे कौतूक करण्यात आले .
यावेळी नेते सोमनाथ गुड्डे यांचा एकदम साध्या पाद्धतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
या कार्यक्रमाला धाराशिव जिल्ह्याचं खंबीर नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख मोहनजी पनूरे , शिवसेना तुळजापूर तालुका प्रमुख अमोल जाधव शेतकरी संघटना अध्यक्ष तुळजापूर शहर प्रमुख बापूसाहेब भोसले, शिवसेनानेते शहाजी हाक्के व अन्य पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते .
सर्व विद्यार्थ्यांनी शैक्षणिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे शिक्षणासाठी गोर गरीब विद्यार्थांना मार्गदर्शन व शैक्षणिक पात्रता राखण्यासाठी उपयुक्त मदत करणे उत्तम असते त्या साठी सतत कार्यरत राहुन मदत करणार आसल्याचे मत सोमनाथ गुड्डे यांनी व्यक्त केले .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत