नायगाव तालुक्यातील पाटोदा येथे एका युवकाने गळफास घेऊन केली आत्महत्या.

नायगाव तालुक्यातील पाटोदा (त.ब.) येथे एका युवकाने त्याच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.ज्ञानेश्वर माधवराव शिंदे (वय ३३) असं या युवकाचे नाव असून, रविवारी (ता.24) सकाळी आठ वाजता त्यांचे भाऊ चंद्रकांत शिंदे यांना ज्ञानेश्वर शिंदे हे गळफास घेतलेल्या स्थितीत आढळल्याने त्यांनी लगेच कुंटूर पोलीस ठाण्याला कळवले. दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यावर कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धनराज निखाते यांच्यासह पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल हंबर्डे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बरबडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केला. वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पबितवार यांनी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द केला.रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ज्ञानेश्वर शिंदे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
ज्ञानेश्वर शिंदे हे शेती करीत होते. त्यांच्यावर राष्ट्रीय बँकेचे अंदाजे दोन लाख रुपये कर्ज होते. त्यांनी नैराश्येपोटी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे समजते. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, तीन भाऊ असा परिवार असून मयत ज्ञानेश्वर शिंदे यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.याप्रकरणी कुंटूर पोलीस ठाण्यात आकास्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून कुंटूर पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत