देशमहाराष्ट्रमुख्यपानविचारपीठ

” महात्मा जोतिबा फुले.!”

होतास तू मोठा मालदार, कंत्राटदार, अन जमीनदार,
धन धान्यांनी , फुललं होतं शिवार,
घडवलास, अचंबित चमत्कार,
सहन करीत, सनातनी फुत्कार.!

तू अनवाणी चाललास, मळलेल्या वाटेने,
नच डगमगलास,
जातीयतेच्या निष्ठुर भीतीने,
केलीस विहीर खुली,
तहानलेल्या विस्थापितांसाठी,
मानवतेने.!

केलीस सावित्रीस साक्षर,
ठोकरुन परंपरा जाचक,
तोडलीस शृंखला घातक,
घेतलास ध्यास स्त्रिशिक्षणाचा,
झेलली उभयता शेणफेक,
वारंवार, शांतचित्तपूर्वक .!

ओढलेस तू कोरडे, चाबकाच्या
फटकार्‍याने,
मांडल्यास दैना,
बळीराजाच्या तन्मयतेने,
भिडलास सत्ताधिशांशी,
चित्त्याच्या बेधडक शक्तीने.!

आवळल्या मुठी, सनातनी बाजिंद्यानी,
धाडले मारेकरी, सुपारी देऊनी ,
नाही डगमगलास, जिवाच्या भीतीने,
केले धटिंगण शांत, उपदेशाने,
क्षमा मागून,चरणस्पर्श केला,
माघारी जाताना, पश्चातापाने.!

माघारी जातांना, पश्चातापाने.!!

माघारी जातांना, पश्चातापाने.!!!

जयभीम.

अरुण निकम.
9323249487.
मुंबई.
दिनांक…06/05/2025.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!