आमदार अपात्रतेबाबत सोमवारपासून सुनावणी सुरू होणार.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंडखोरी करत आपला वेगळा गट स्थापन केला. शिंदे गटातील 16 आमदारांना अपात्र ठरवावं, अशी मागणी ठाकरे गटान केली. या 16 आमदारांच्या अपात्रेसंदर्भात निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी न घेतल्याने ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती.
उद्या ठाकरे आणि मुख्यमत्री एकनाथ शिंदेंनाही नोटीस पाठवली जाणार आहे. तसंच सोमवारपासून दोन्ही गटाच्या आमदारांची सुनावणी घेतली जाणार आहे. मागील आठवड्यात सुनावणी सुरू झाली होती. त्यानंतर आमदारांनी एक आठवडा वेळ मागितला होता. ठरलेल्या वेळेनुसार सुनावणी होणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्षांनी दिलीय.
शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रेबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्लीत जाऊ कायदेशीर सल्लामसलत केली. त्यानंतर आता येत्या सोमवारपासून आमदार अपात्रतेबाबची सुनावणी सुरु होणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत