रिपब्लिकन सेनेची प्रचंड घोडदौड

आनंदराज आंबेडकरांच्या ” रिपब्लिकन सेनेची आंबेडकरी समुह आणि आंबेडकरी चळवळीत , मुंबई येथील मरोळ अंधेरी परिसरात, प्रचंड घोडदौड सुरू ” – समाजभूषण वसंत कांबळे प्रवक्ते रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य… दिनांक 22.09.2024 रोजी रिपब्लिकन मुंबई प्रदेश , अध्यक्ष प्रकाशभाऊ खंडागळे यांच्या आयोजन,नियोजनात आणि युवा रिपब्लिकन सेना मुंबई प्रदेश युवा अध्यक्ष बाबासाहेब गायकवाड यांच्या पुढाकाराने, योग्य नियोजन आणि अंमलबजावणी संघटन कौशल्याने, सरसेनानी रिपब्लिकन सेना राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर साहेब , यांच्या नेतृत्वाखाली आणि आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते, मुंबई मरोळ अंधेरी (पूर्व )येथील , विजय नगर येथे अनेक ठिकाणी पक्षाचे कायमस्वरूपी बोर्डाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाचे नियोजन आणि आयोजन आणि मोलाचे योगदान मुंबई प्रदेश अध्यक्ष प्रकाश भाऊ खंडागळे यांनी केले.या कार्यक्रमात शेकडो युवा कार्यकर्त्यांनी’ रिपब्लिकन सेनेत ‘ प्रवेश केला.त्यांना मा.आनंदराज साहेबांच्या हस्ते नियुक्ती पत्रही देण्यात आले.या कार्यक्रमात प्रचंड संख्येने आंबेडकरी जनतेसह, अल्पसंख्याक, आणि हिंदी भाषिक जनता तसेच व्यापारी, आणि हाॅकर्स धंदा व्यवसाय करणारे बांधवही उपस्थित होते.या प्रसंगी रिपब्लिकन सेना महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष बी.टी . शेंडे, यांनी महाराष्ट्र राज्य रिपब्लिकन सेनेच्या वतीने नेते आनंदराज आंबेडकर साहेब व सर्व प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत, अभिनंदन व आभार व्यक्त केले. मुंबई प्रदेश निरिक्षक विनोद काळे, सचिव गजानन तांबे, शशीकांत लिंबारे, जिल्हा पदाधिकारी भाई जोशी, संजय मगरे, गणेश गायकवाड सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाजभूषण वसंत कांबळे यांनी केले.तर हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रिपब्लिकन सेना अंधेरी तालुका अध्यक्ष फिरोज शेख सह त्यांचे सर्व सहकारी तसेच उत्तर पश्चिम जिल्हा युवा अध्यक्ष बाबासाहेब सदावर्ते , नितीन उपाध्ये, लक्ष्मण सदावर्ते, अविनाश गायकवाड, विनायक दंवडे आणि सहकारी यांच्यासह इतर सर्व पदाधिकारी यांनी फार मोलाचे योगदान दिले.Mumbai Date 22.09.2024/VK
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत