सेल्फी काढताना केट्स पाँईंटवरून दरीत कोसळून महिलेचा मृत्यू

महाबळेश्वरमध्ये केट्स पाँईंटवरून सेल्फी काढताना पर्यटक महिला दरीत कोसळून तिचा मृत्यू झाला.महाबळेश्वर पर्यटनाला आलेली महिला सेल्फी काढत असताना तोल जाऊन दरीत कोसळली.ही नवविवाहीत युवतीचे नाव अंकिता गुरव असे असून ती पतीसह धाराशिव उस्मानाबादचे येथील आहेत. पत्नी दरीत कोसळ्याची माहिती तीच्या पतीने स्थानिकांना आणि पोलिसांना दिल्या नंतर लगेचच महाबळेश्वर ट्रेकर्सचे कार्यकर्त्यांनी दरीत उतरुन तीला वर काढण्याचे प्रयत्न सुरु केले. सुमारे दोन तासाच्या अथक प्रयत्नानंतर या महिलेला बाहेर काढण्यात आले. संबधित महिला ही पती सोबत महाबळेश्वर फिरण्यासाठी आली होती. ते दोघेही महाबळेश्वर येथील केटस पाँईंट वर गेले होते. हे दांपत्य दरीच्या टोकावर सेल्फी काढत असतान महिला दरीत कोसळली.
ही महिला जवळपास सुमारे साडेपाचशे ते सहाशे फूट खोल दरीत पडली . याची माहिती तीच्या पतीने स्थानिक दुकानदार आणि पोलिसांना दिल्यानंतर महाबळेश्वर ट्रेकर्सचे कार्यकर्ते हे घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी त्या महिलेला बेशुध्द अवस्थेत वरती आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. मात्र वरती आणल्यानंतर ती महिला मृत असल्याचे सांगण्यात आले आहे. हे दांपत्या सध्या पुणे येथे रहात असून अंकिताचे पती हे रेल्वेमध्ये कार्यरत अशल्याची प्राथमिक महिती मिळाली आहे. अंकिंतावर महाबळेश्वर येथील ग्रामिण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे. घटनास्थळी सध्या पोलिस पोहचे असून त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करण्यास सुरुवात केली आहे. नवविवाहितेचा मृत्यू झाल्याने परिसरात व उपस्थित पर्यटकांमधून हळहळ व्यक्त करण्यात येत होती.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत