स्वराज्य संकल्पक शहाजी राजे भोसले यांच्या स्मृतीस अभिवादन…

▪️अभिवादक ▪️
आयु. प्रशांत चव्हाण सर.
नेतृत्वहीन समाजाला नेतृत्व करायला लावणारे सरलष्कर, आस्मानी सुलतानी संकटातून स्वतंत्र राज्यकारभाराचा अनेक वेळा प्रयत्न केलेले, निवडक साथीदार सोबतीला देऊन ‘न भुतो न भविष्य’ती स्वराज्य घडवीले गेले अशा प्रेरणादायी स्वराज्याचे स्वराज्यसंकल्पक असणारे शहाजीराजे भोसले यांचा आज स्मृतिदिन होय.
पराक्रम, युध्दप्रसंगाची बुध्दिमत्ता, उत्तम प्रशासन, स्वतंत्र राज्यकारभार या गुणांचे शिवरायांमध्ये बीजारोपण करणारे, अनंत संकटावर मात करत स्वराज्याच्या बांधणीसाठी अतोनात प्रयत्न करणारे,स्वराज्यसंकल्पक, कुटूंबवत्सल आदर्श पती आणि कर्तबगार पिता, स्वराज्याचे स्वप्न उराशी बाळगणारे राजकीय मुत्सद्दी शहाजीराजे भोसले यांच्या स्मृतीस विनयशील अभिवादन…!!
▪️नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या१२७ व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन▪️
“तुम मुझे खून दो,
मै तुम्हे आजादी दूंगा ,
नारा देऊन पुकारले,
नेताजींनी जनतेला !
जमवून शूर-वीर भारत
भू – च्या पुत्रांना
हादरा दिला जुलमी
इंग्रजी सत्तेला”!!!
▪️२२ जुलै १९४० रोजी मुंबई येथे सुभाषचंद्र बोसांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेशी भेट झाली होती. दोघांमध्ये देशाचे स्वातंत्र्य आणि देशातील जातीयता व अस्पृश्यता यावर चर्चा झाली. अशा या महापुरुषांना विनम्र अभिवादन
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत