डॉ.आंबेडकर विधी महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जयंती साजरी…

वडाळा, मुंबई येथील पीईएस शिक्षण संस्थेच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर विधी महाविद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले जयंती नुकतीच साजरी करण्यात आली.प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लेखक व व्याख्याता तथा मुंबई विद्यापीठ इतिहास विभाग प्रमुख डॉ. प्रा. संदेश वाघ होते.त्यांनी सावित्रीमाई फुले यांचे कार्य व फुले शाहू आंबेडकरी चळवळीवर आपले अभ्यासपूर्ण विचार मांडले.कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्र. प्राचार्या डॉ.यशोधरा वराळे मॅडम होत्या. विचारमंचावर डॉ. जावळे , उपप्राचार्य प्रा. सुभाषचंद्र सोनकर , प्रा . प्रीती धोत्रे , विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून बालूशा माने, सुमेध सावंत यांनी आपले विचार व्यक्त केले. वडरेराव अन्य मान्यंवर उपस्थितीत होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मधुकर वारभुवन यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग व विद्यार्थ्यांनी बहुमोल सहकार्य केले.या प्रसंगी ‘ कायदेशीर मदत केंद्राचे ‘ उद्घाटन डॉ. प्रा संदेश वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत