
“संसदेच्या नव्या इमारतीचं उद्घाटन झालं. भाजपाने तामिळनाडूतून अधीनम बोलवले होते. त्यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला. मात्र भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण देण्यात आलं नाही. कारण त्या विधवा आहेत आणि आदिवासी जमातीच्या आहेत. हाच का तुमचा सनातन धर्म? आम्ही या विरोधात आमचा आवाज उठवत राहू.” असं म्हणत तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी भाजपावर आणि मोदीसरकारवर टीका केली आहे. काल उदयनिधी स्टॅलिन हे मदुराईतल्या एका कार्यक्रमात गेले होते. तिथे त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत