‘पोलिस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा मागे घे, अन्यथा तुझ्या मुलीवर बलात्कार करेन’

छत्रपती संभाजीनगर मध्ये तिघांच्या टोळक्याने महिलेस बेदम मारहाण केली. तसेच तिचे कपडे ओढत तिच्यासह तिच्या मुलीचा विनयभंग केला. ही घटना ५ सप्टेंबर रोजी भावसिंगपुरा भागात घडली होती.‘पोलिस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा मागे घे, अन्यथा तुझ्या मुलीवर बलात्कार करेन’ अशी धमकी तिघांच्या टोळक्याने महिलेस दिली. याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार ती तिच्या मुलीला शाळेतून घरी घेऊन जात असताना आरोपींनी दुचाकीवर त्यांचा रस्ता अडवत वरील धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान फिर्यादीला शिवीगाळ करत तिच्या मुलीला अश्लील स्पर्श करत फिर्यादीचीही साडी ओढत विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास उपनिरीक्षक जोंधळे करत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत