दारु पिऊन त्रास देत असल्याने मुलाने वडिलांचा केला खून

बीडच्या माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड येथे दारू पिऊन त्रास देत असल्याने मुलानेच वडिलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. मयत मुंजा एकनाथ कटारे (वय 52) यांना दारूचे व्यसन होते.
अनेक वेळा सांगूनही न ऐकल्याने मुलगा अशोक कटारे याने 16 सप्टेंबर रोजी जन्मदात्या वडिलांचा खून करून त्यांच्या तोंडाला पिशवी बांधून मृतदेह परभणीच्या इंद्रायणी नदीत फेकून दिला. मात्र परभणी पोलिसांनी या खुनाचा छडा लावत ही घटना उघडकीस आणली. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यासह दिंद्रुड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे..
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत