
इंडिगोनं प्रवाशांना त्यांच्या तिकिटांवर 15 टक्क्यांची सवलत अशी खास ऑफर आणली आहे. याद्वारे तुम्हाला स्वस्त तिकिटे मिळू शकता. इंडिगोकडून दिली जाणारी ऑफर ही 25 सप्टेंबर 2023 पासूनच्या प्रवासासाठी सुरु होणार आहे. ही ऑफर 31 मार्च 2024 पर्यंत असणार आहे. याकाळात प्रवासी लाभ घेऊ शकतात. 31 मार्चपर्यंत ही सवलत मिळणार आहे.
या ऑफरचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना इंडिगोची वेबसाइट, इंडिगोचे मोबाइल अॅपद्वारे तिकीट बुक करावे लागेल. यासाठी त्यांना फ्लाइट बुक करताना प्रोमो कोड लावावा लागेल. सणासुदीच्या काळात वाढलेली प्रवासी मागणी वाढवणे आणि त्याची पूर्तता करणे हा या विक्रीचा उद्देश आहे. ही ऑफर इंडिगो कोडशेअर कनेक्शनसह सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय फ्लाइट्सवर लागू होईल. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर इंडिगोने ट्वीटरवर यासंदर्भात माहिती दिली आहे.
(इंडिगो ही भारत देशामधील विमानसेवा पुरवणारी एक विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोचे मुख्यालय गुरगाव येथे आहे. ही कंपनी कमी दरात सेवा देणारी कंपनी म्हणून ओख आहे. जगभरातील कंपन्यांमध्ये सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्यांपैकी ही एक कंपनी आहे. इंडिगोची सर्व विमाने जांभळया आणि पांढऱ्या रंगाने रंगविलेली आहेत. विमानाचा तळभाग जांभळया रंगाने रंगविलेला असून शेपटीखाली निळसर रंगाचे पट्टे असतात. विमानाच्या पांढऱ्या पृष्ठभागावर इंडिगोचे इंग्लिश नांव मोठया अक्षरांमध्ये लिहिलेले दिसते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत