“पक्षात फूट पडली नाही, आम्ही केवळ अध्यक्ष बदलला आहे”, छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया

जयंत पाटलांच्या विधानावर भुजबळांची प्रतिक्रिया देत छगन भुजबळ म्हणाले की,“पक्षात फूट पडली नाही, आम्ही केवळ अध्यक्ष बदलला आहे”. जयंत पाटलांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना भुजबळ म्हणाले, “चांगली गोष्ट आहे. आम्हीही म्हणतो आमच्या पक्षात फूट पडली नाही. आम्ही फक्त अध्यक्ष बदलले आहेत. काही लोक बदलले आहेत. वेगवेगळे पदाधिकारी बदलले आहेत. जसे की अजित पवार हे आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत. याबाबत निवडणूक आयोगाला आम्ही आधीच कळवलं आहे.”
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर काही नेते सोडले तर कोणता आमदार कोणत्या गटात आहे, याचं चित्र अद्याप स्पष्ट झालं नाही. राजकीय नेत्यांसह लोकांमध्येही याबाबत संभ्रम आहे. पक्षात कोणतीही फूट पडली नाही, असा दावा दोन्ही गटांकडून केला जात आहे. अशी एकंदरीत स्थिती असताना निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं मान्य केलं आहे. तसेच दोन्ही गटांना ६ ऑक्टोबर रोजी सुनावणीसाठी बोलावलं आहे.
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला आहे. पक्षात कसलीही फूट पडली नाही, असं शरद पवारांनी सांगितलं असताना, निवडणूक आयोगानं ६ ऑक्टोबर रोजी पक्षफुटीवर सुनावणी ठेवली आहे, असा आरोप जयंत पाटलांनी केला. जयंत पाटलांच्या या विधानावर अजित पवार गटाचे आमदार छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत