महाराष्ट्रात जातीवाद्यांना कायद्याचा धाक राहिला नाही ? बौद्ध तरुणावर लघुशंका करून लोखंडी रॉड ने मारहाण !

गुरुवार दि.९ मे २०२४ उमरखेड (जि. यवतमाळ) : तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील पवन दिलीप वाठोरे (वय २४) या बौध्द तरुणाला गावातील जातीयवाद्यांनी “आमच्या भाचीकडे का बघतोस”असे म्हणत लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. मारहाणीनंतर या जातीयवाद्यांनी बौध्द तरुणाच्या अंगावर लघुशंका केली. जातीवाचक शिवीगाळ करत लाकडाने मारहाण केले. या जातीयवाद्यांनी बौध्द तरुणाच्या आईलाही बेदम मारहाण केली. आमच्या विरोधात पोलीस स्टेशनला तक्रार केली तर जिवे ठार मारु अशी धमकी दिली. परंतु बौध्द तरुणाने हिम्मत करुन पोलीस स्टेशनला तक्रार दिली.
या तक्रारीवरुन पोलिसांनी 9 नराधमां विरूध्द ॲट्रॅासीटी सह इतर कलमान्वये गुन्हा नोंद केला आहे.
पवन वाठोरे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, ज्ञानेश्वर निमलवाड (वय २३ वर्ष, जात मुनरवार, रा. ढाणकी) हे माझ्या घरात दरवाज्याला लाथ मारुन घुसले. व पवन कोठे आहे त्याला मारायचे आहे असे म्हणून लागले. ते आमच्या आत्याच्या मुलीला का बघतो असे म्हणुन मला घरात शोधू लागले. तेव्हा मी घरातून घाबरून पाठीमागच्या दरवाज्याने पळुन गावात गेलो. त्यानंतर त्यांनी माझ्या आईला बेदम मारहाण केली.
ते माझा गावात शोध घेत होते. त्यानंतर कांहीं वेळाने मी त्यांना गावात छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ चालू असलेल्या घराच्या बांधकामा जवळ आडोसा घेवून बसलेला दिसलो. तेव्हा त्याच्यासोबत भैया अशोक घोगरकर (वय १९ वर्ष जात लोहार), विशाल धबडगे (वय २८ वर्ष जात मराठा), बंटी धबडगे (वय २१ वर्ष जात मराठा), बादल पुर्ण नाव माहित नाही (वय २३ वर्ष जात माहित नाही), अर्जुन सुगमरवाड (वय २२ वर्ष जात मुनरवार), रघु दिगांबर कर्नेवाड (वय ४० वर्ष जात मुनरवार), परमानंद आडवे
(वय ३२ वर्ष जात मुनारावार) (सर्व राहणार ब्राम्हणगाव ) यांनी मला पकडले. त्यांनी मला दोन्ही हात व पाय पकडून रस्त्यावर ढकलून दिले. पाठीवर, पायावर मारहाण केली. तसेच त्यांनी आडजात लाकडांनी दोन्ही हातावर मारहाण केली. त्यांनी लाथा बुक्क्यांनी मला जमिनीवर पाडून मारहाण केली. त्यादरम्यान माझ्या जवळील व्हिओ कंपनीचा मोबाईल किंमत १७,०००/- रुपये व नगदी १०,०००/- रुपये खिश्यातुन पडले ते त्यांनीच घेतले असावे. त्यानंतर त्यांनी
बसवुन चला याला पोलीस स्टेशनला नेवून फेकून देवू म्हणून मला तेथून घेवून रस्त्याने येत असतांनी हरदडा फाट्याजवळ गाडी थांबवून मला गाडीवरुन ढकलुन दिले. त्यांनी माझ्या अंगावर लघुशंका करून जातीवाचक शिवीगाळ केली. मला परत गाडीवर बसवुन स्वामी विवेकानंद शाळेजवळ असलेल्या गौशाळेच्या बोर्डाजवळ गाडीवरुन नेऊन मला पुन्हा लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. याला खतम करून टाकू अशी जिवाने मारण्याची धमकी दिली. पुन्हा मला मोटार सायकल वर बसवून पोलीस ठाण्यात आणून लाथा मारुन पोलीस स्टेशनला आणून बसविले. पोलिसांनी माझी सरकारी दवाखाण्यातुन वैद्यकिय तपासणी करुन घेतली. तेव्हा मला पप्पू निमलवाड यांने रिपोर्ट दे, तुला बाहेर आल्यावर खतमच करतो अशी धमकी दिल्याने मी रिपार्ट दिला नाही. पोलीसांसोबत माझ्या घरी गेलो, माझ्या तब्यतीत सुधार झाल्याने पोलीस स्टेशनला येवून त्यांच्या विरूध्द योग्य त्या कार्यवाही करीता तक्रार देत आहे. माझा जबानी रिपोर्ट माझ्या सांगन्याप्रमाणे संगणकावर टाईप केला यी वाचून पाहिला माझ्या सांगण्याप्रमाणे बरोबर आहे.
या तक्रारीवरुन ९ जातीयवाद्यांना भारतीय दंड संहिता १८६० नुसार कलम 141, 143, 147, 323, 324, 506, 149, 452, अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९, ३(१) (आर), ३(१) (एस), ३(२) (विए) इत्यादी कलमानुसार उमरखेड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार संजय सोळंके हे करीत आहेत.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत