बीजेपी हे जनतेला आणि देशाला न परवडणारे सरकार –
प्रा. देविदास इंगळे
चिल्लर योजनांचा पाऊस पाडून ठोक लूट बीजेपी सरकारने चालू केलेली आहे.
उघड उघड जनतेला बीजेपी सरकार लुटत आहे जनता जिएसटी मुळे मेटाकुटीस आलेली असतांना वरतून वस्तूंचे भाव दिवसेंदिवस गगनाला भिडत आहेत सामान्य जनतेला जगावे की मरावे हेच कळत नाही.
100 रुपयांचा स्टॅम्प पेपर बंद करणे म्हणजे आता 500 रुपयाचा बॉण्ड घ्यावाच लागणार त्याशिवाय पर्याय नाहीच म्हणजे एका स्टॅम्प पेपर मागे 400 रुपये वाढ हे जनतेला न परवडणारी बाब आहे.
ही गोष्ट भाजपा सरकारच्या लक्षात येते पण हे सरकार त्यास गांभीर्याने घेत नाही याचाही विचार झाला पाहिजे त्यामुळे जसे सरकार सतेत बसवले तसेच खाली उतरवता सुद्धा येते आणि ती वेळ आलेली आहे त्याबद्दल्यात प्रबळ दावेदार पक्षाला मत दिल्याशिवाय बदल घडू शकत नाही.
म्हणून सरळ मोठया पक्षा ला मत दया चालचील्लर पक्ष म्हणजे बीजेपी ला मत होय म्हणून मत वाया घालवू नये हे जनतेनी ध्यानात घ्यावं.
प्रश्न आहे शिक्षणाचा, प्रश्न आहे आरोग्य सुविधांचा, प्रश्न आहे रोजगारीचा, प्रश्न आहे महागाईचा यांनी तेल, पेट्रोल, डिझेल, गॅस सर्व भाव वाढवले
किती पट वाढले नो लिमिट बघा जरा.
प्रश्न एक नाही अनेक प्रश्न आहेत तेल 130 वरून 160-170 वर गेले त्याअगोदर 200 वरही गेले होते.
तेल डबा 1500 वरून 2200 वर गेला.
गॅस 500 वरून 828 अगोदर 1000 पण झाला होता आता इलेक्शन लागले म्हणून मतासाठी कमी करण्यात आले भाव.
खत 2200 वरून 3300 वर काय आमच्या घरात नाशिक नोटा छापण्याचा कारखाना थोडाच आहे की नोटा छापायच्या आणि लगेच द्यायच्या तसंही काही नाही हे सरकारला कळत नाही का? कोण मेले कोण खपले या सरकारला सुतक नाही त्यांना केवळ अमाप पैसा गोळा करून आमदार, खासदार फोडण्यासाठी पैसा पाहिजे अशा सरकारला सतेतून घरी बसवून सांगावं लागेल.
संविधान सर्वांना समान न्याय, समान हक्क, समान संधी देते हे सरकार संविधानाचे सुद्धा उ्लंघणं करत आहे.
न्याय न देणे, आमदार, खासदार फोडणे सरकार तोडणे ही तोडा आणि फोडा व राज्य करा हे संविधान व लोकशाहीसाठी घातक आहे.
केंद्र सरकार व राज्य सरकार खाजगीकरणाचा सपाटा लावलेला आहे.
जसे की रेल्वे, इन्शुरन्स कंपन्या,विमानतळे,शाळा, दवाखाने, एल. आय. सी सर्व सरकारी कंपन्या विकून रोजगार असणाऱ्यांना बेरोजगार करीत आहे ही गोष्ट जनतेनी गांभीर्याने घेणे आवश्यक आहे.
उद्या आपली घरे, प्लॉट,, शेती
जंगले सुद्धा विकून बरबाद करतील म्हणून परिस्थिती बिकट आहे आणि हे सर्व असंविधानिक आहे.
म्हणून याचा जनतेनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे आणि या सरकारला सत्तेतून घालवणे गरजेचे आहे.
नको लाडका भाऊ नको लाडकी बहीण आमच्या हक्काचे दर कमी हवेत.
शेती मालाला हमी भाव पाहिजे
हे सरकार जनतेचा विचार न करता उद्योगपतींचे कर्ज माफ करीत आहे अमाप जिएसटी आकरत आहे.
म्हणून सरकार सतेत ठेवणे योग्य नाही.
सर्वांनी साथ दया साथ घ्या सरकारला घालवा व गुलामी टाळा.
धन्यवाद
आपला स्नेही
प्रा. देविदास इंगळे
राष्ट्रीय अध्यक्ष
राष्ट्रीय संविधान बचाव अभियान.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत