खान्देशमहाराष्ट्रमुख्यपान

नागपुरातील मेडिकल-मेयो रुग्णालयात २४ तासांत २५ रुग्णांचा मृत्यू.

नागपुरातील मेडिकल-मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतही २४ तासांत २५ मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.मेडिकल आणि मेयो या दोन्ही रुग्णालयांवर राज्यातील विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यातीलही अत्यवस्थ रुग्णांचा भार आहे. या रुग्णांसाठी मेडिकलला १ हजार ४०१ अधिकृत तर ट्रामा व अतिरिक्त मिळून एकूण सुमारे १,८०० खाटा आहेत. मेयो रुग्णालयात ८२२ खाटा आहेत. दोन्ही रुग्णालयांत रोज सुमारे दीड हजार रुग्ण दाखल होऊन उपचार घेतात. दरम्यान, मेडिकलमध्ये २ ऑक्टोबरला २४ तासांत तब्बल १६ आणि मेयो रुग्णालयात ९ रुग्णांचा मृत्यू नोंदवला गेला. हे रुग्ण वेगवेगळ्या वयोगटातील आहेत. मेडिकलला दगावलेल्या एकूण रुग्णांपैकी ८ रुग्ण हे खासगी रुग्णालयांतून अत्यवस्थ अवस्थेत या ठिकाणी आले होते. या रुग्णांना मेडिकलच्या डॉक्टरांनी अतिदक्षता विभागात हलवले. परंतु २४ तासांच्या आत त्यांचा मृत्यू झाला. मेयोतही हीच स्थिती होती. त्यामुळे खासगी रुग्णालये त्यांच्याकडचे मृत्यू कमी दाखवण्यासाठी शेवटच्या क्षणी त्यांना मेडिकल-मेयोत हलवत असल्याचे निरीक्षण येथील काही डॉक्टरांनी नाव न टाकण्याच्या अटीवर नोंदवले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!