जातीच्या भिंती तोडणाऱ्या शैलजा पाईक यांना आठ लाख डॉलर्सचा अमेरिकेचा प्रतिष्ठित ‘ जिनियस ग्रँट ‘ पुरस्कार !____

पुण्यातील झोपडपट्टीत वाढलेल्या आणि सध्या अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या दलित लेखिका , इतिहासकार तथा प्रोफेसर शैलजा पाईक यांना अत्यंत प्रतिष्ठित आणि बहुप्रतिक्षित “जिनियस ग्रँट “समजला जाणारा आठ लाख डॉलर्सचा ( सुमारे ६. ७ कोटी भारतीय रुपये )मॅकआर्थर पुरस्कार देण्यात आला आहे . सदर पुरस्कार मिळवणाऱ्या शैलजा पाईक पहिल्या दलित महिला ठरल्या आहेत .
दरवर्षी असाधारणक्षमताप्राप्त , विशेष उपलब्धी मिळवणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो . शैलजा पाईक सध्या अमेरिकेतील सिनसिनाटी विद्यापीठात प्रोफेसर म्हणून कार्यरत असून त्यांचे दलित महिलांच्या स्थितीवर संशोधन कार्य सुरु आहे .त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली तसेच त्या इतिहासकार म्हणून ओळखल्या जातात .
शैलजा मूळच्या अहमदनगर जिल्ह्यातील एका खेडयात जन्मलेल्या आहेत . लहाणपणापासून त्यांना जातीवादाचे भयंकर चटके बसले . लहाणपणी कथित उच्चवर्णीयांच्या घरी त्या आपल्या आजीसोबत गेल्या असता त्यांना खाली जमीनीवर बसवण्यात आले तर दुसऱ्या कथित उच्चवर्णीयांना खुर्चीवर बसवण्यात आले . गावातील सार्वजनिक ट्यूबवेल ,विहिरीवर त्यांना पाणी भरू दिले जात नव्हते हा अपमान सहन न झाल्याने त्या १९९० साली त्या कुटुंबासमवेत पुण्यातील झोपडपट्टीत राहण्यास आल्यात.
मंगळवारी त्यांना मॅकआर्थर पुरस्कार घोषित झाल्यावर , हे ऐकून आपल्या कानावर विश्वासच बसला नसल्याचे सांगत त्यांनी आनंद व्यक्त केला . शैलजा पाइक यांना मिळालेली ही फेलोशिप आधुनिक भारतातील दलित स्त्रियांच्या जातीय भेदभाव , लैगिक शोषणावर त्यानी केलेल्या कार्याची पावती समजली जाते .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत