महाराष्ट्रमुख्यपानराजकीयविचारपीठ
या भुरट्यांना- अनंत दा. राऊत
राजकारण आता
राहिलं ना राष्ट्रकारण
पुढाऱ्यांनी स्वीकारलं गा
स्वार्थी धंद्याचं धोरण
तत्त्व, पक्षनिष्ठा यावर यांनी
केव्हाच मारली टांग
जो तो भटकतो सत्तेसाठी
पिऊन अघोरी भांग
ज्यानं दिला मानसन्मान
आणि मोठी सत्ता
स्वार्थासाठी त्यालाच हा
जाहीर मारतो लाथा
सत्तेपेक्षा असते फार
तत्त्वनिष्ठा मोठी
कधी कळतील या भुरट्यांना
मूल्यमय गोष्टी?
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत