दोन चिमुरडीवर अत्याचार करणारा नराधम अक्षय शिंदे पोलीस चकमंकीत मारला गेला
तानसेन ननावरे
चार व सहा वर्ष वयाच्या दोन चिमुरडीवर अत्याचार करणारा नराधम अक्षय शिंदे पोलीस चकमंकीत मारला गेला आणि बदलापूर वासियांनी मिठाई वाटून फटाके फोडून जल्लोष साजरा केला कारण नराधम अक्षय शिंदे याला ताबडतोब फाशी द्या अशी त्यांची मागणी होती त्या साठी त्यांनी दहातास रेल्वे ट्राफिक रोखून धरली होती दहातास बिन अन्न आणि पाण्या वाचून जनता रेल्वे ट्रॅक वर बसून होती
अक्षय मारला गेला लोक उत्साह साजरा करीत असताना उबाठा महाभकास आघाडी मात्र सुतकात गेली अक्षय मारला गेल्याचे त्यांना अति दुःख झाले अक्षयचे हात बांधले होते त्याने पोलिसांची बंदूक चालवली कशी, बंधूकीचे लॉक त्याने
ओपन केले कसे सर्वात बावळट प्रश्न अक्षयने पोलिसांची बंदूक हिसकावून घेतली तेंव्हा पोलिया झोपा काढीत होते का
अक्षय शिंदेचा खून झाला, सुपारी घेऊन मर्डर केला, तपास रोखण्यासाठी मोठ्या असामीला वाचविण्यासाठी अक्षय मारला गेला असा संशय संजय राऊत यांनी नासिक येथून केला बहुतेक गांझा ओढून बोलत असतील
चार घर फिरून आलेली सुषमा अंधारी बाई म्हणते न्यायालयाचा, न्याय देवतेचा खून झाला
शरद पवारांच्या पक्षाचे नारद जयंत पाटील म्हणतातb एनकाउंटरची चौकशी झाली पाहिजे संजय शिंदे ह्या पोलीस अधिकाऱ्याने अक्षय शिंदेवर गोळ्या झाडल्या त्या संजय शिंदे याचे रेकॉर्ड तपासा अहो नारदमुनी जयंतराव पाटील सचिन वझे याला सतरा वर्षा नंतर पोलीस सेवेत रुजू करून घेतले त्यास सिंगल पोस्ट प्रमोशन दिले तेंव्हा तयाचे सर्व्हिस रेकॉर्ड तपासा असे आपल्या गटाचे गृह मंत्री अनिल देशमुख यांना सांगितले पाहिजे होते निदान मनसुख हिरेन निष्पाप वाचला असता
पालघरात साधू जीव वाचविण्यासाठी पोलिसांच्या आश्रयला पोलीस चौकीत गेले पोलीस चोकी सोडून पळून गेले दोन साधूना जमावाणे हाल हाल करून ठेचून मारले त्या पळपुट्या पोलिसांचे रेकॉर्ड तपासले का मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गृहमंत्री अनिल देशमुख मूग गिळून बसले होते आणि जयंतराव पाटील आपण कुठे झोपा काढत होता
अडिशनल पोलीस कमिशनर ए ए खान दशटवादी पथकाचा प्रमुख होता त्याने लोखंवाला अंधेरी येथे म्हाडाच्या निवासी वस्तीत घेराव घालून बंद सदनिकेत लपलेल्या सदा मामा पावले, मन्या सुर्वे, सुनील सावत्या ह्या जिगरबाज मराठी पोरांचा दिवसा ढवळ्या हजारो लोका समोर फेक एनकोउंटर केला
ए ए खान याने अरविंद इनामदार ह्या पोलीस सहायुक्त दरज्याच्या अधिकार्यास घटना स्थळावरून पिटाळून लावले तेंव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचेच सरकार होते तेंव्हा शुटाऊट लोखंडवाला फेक एनकोउंटरची चौकशी का मागितली नाही
ए ए खान याचे सर्व्हिस रेकॉर्ड का तपासले नाही
कारण मेलेले हिंदू होते, लढावू होते दाऊद इब्राहिमचे कर्दनकाळ होते
तो इसाक बागवान ज्याने सुहास भाटकर उर्फ पोट्या ज्याच्या नावाने दाऊद चळचळा कापायचा त्या पोत्याला मिलन सबवे येथे रिक्षा मध्ये गोळ्या घातल्या फेक इन्कोउंटर मध्ये मारला गेला पोत्याला मारायची सुपारी कुणी दिली तुमच्याच कॉग्रेस पक्षाच्या गुलाब जोशी याने
आज इसाक बागवान याचे बारामती शहराच्या माधभागी आलिशान सेवनस्टार हॉटेल आहे कोण कुठला बागवान बारामतीमध्ये त्याला कुणी आसरा दिला
बाळासाहेब ठाकरे अरुण गवळीचा अभिमानाने उल्लेख करायचे तुमच्या कडे दाऊद आहे माझ्याकडे अरुण आहे अरुण हिंदू डॉन आहे असेही गौरवाने बोलत असे
त्या अरुण गवळीचा उजवा हात रमा नाईक याचा दाऊद इब्राहिम च्या ईशाऱ्यावर चेंबूर मैत्री पार्क येथे रमा दाढी कटिंग करायला बसला होता पोलिसांना बघून रमा पळाला परंतु चुकून इमारतीच्या गच्चीकडे टेरेस कडे पळाला व अडकला पोलिसांनी टेरेस वर गोळ्या घालून रमा नाईक याला ठार केला करीम लाला ची सुपारी होती सम्मदखान चा सूड घेण्यासाठी जयवंतराव पाटील नारद साहेब तेंव्हाही तुमचेच सरकार होते एकाही पोलीस अधिकाऱ्याची चौकशी केली नाही कारण तुमचा पक्ष तुमचा नेता तुमचे सरकार दाऊद इब्राहिमसाठी काम करीत होते मराठी तरुणांचे प्राण वाचविले पाहिजे होते
आज तुम्ही तुमचा पक्ष, तुमचा नेता पहिल्या महिला मुख्य मंत्री सुप्रिया सुळे शरद पवारांचा पंटर संजय राऊत, सुषमा अंधारीन, समस्त ठाकरे कुटुंब, नाना पटोले, विजय वाट्टेडीवर, लकवाधारी पृथ्वीराज चव्हाण आणि भकास आघाडी नराधम, अत्याचारी, बल्लात्कारी अक्षय शिंदे साठी गळे काढता आहे थू तुमच्या नीतिमत्तेवर
ज्या मुब्रा बायपासवर अक्षय शिंदे याचा खातमा झाला तिथे मुबऱ्याचा आमदार म्हणे बल्लात्कारी, नराधम अक्षय शिंदे याचे स्मारक उभे करणार असल्याचे ट्विट केले आहे
होय अक्षय शिंदे याला मारला आहे खातमा केला आहे होय मर्डर केला आहे याचे भांडवल करून विधानसभा निवडणुका जिंकायच्या आहेतका
लाडकी बहीण योजनेला बदनाम करण्यासाठी बदलापूर घटनेचा इस्तेमाल केला राज्यात आंदोलन केले
आता अक्षय शिंदेच्या एनकाउंटरचे
भांडवल करित आहात खरे बघता तुमच्यात थोडीशी जरी नीतिमत्ता शाबूत असेल जनाची नाही पन मनाची असेल तर ज्या बहाद्दूर पोलिसांनी नराधम अक्षय शिंदेवर गोळ्या झाडल्या त्या निलेश मोरे, संजय शिंदे त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे
तानसेन ननावरे
युनायटेड रिपब्लिकन पार्टी
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत