महाराष्ट्रमुख्यपानराजकीय

राखीव मोहोळ विधानसभा मतदारसंघातील सत्यता…….

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा हा अनुसूचित जातीसाठी राखीव मतदारसंघ रद्द झाल्याने मोहोळ विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे. या मतदारसंघात अनुसूचित जातीची 15.7% मते आहेत. मोहोळ विधानसभा मतदारसंघात पंढरपूर तालुक्यातील पुळुज व उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा व मर्डी या दोन महसूल मंडळाचा या मतदारसंघांमध्ये समावेश होतो. मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे राजकारण मोहोळ, पंढरपूर उत्तर, सोलापूर अशा तीन तालुक्याशी संबंधित आहे. शरद पवारांचे निकटवर्तीय व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव ढोबळे हे मोहोळ विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होते. मातंग समाजाच्या नेतृत्वाच्या जीवघेण्या स्पर्धेत मातंग समाजाच्याच रमेश कदम जे धाकटे पवार अजित दादांचे निकटवर्तीय आहेत. त्या रमेश कदम यांनी बाजी मारली.

लक्ष्मण ढोबळे अनेक प्रकरणात कोर्ट कचऱ्यात गुरफटले. बलात्कार विनयभंगाच्या गुन्ह्यात तेही अडकले गेल्याने 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने लक्ष्मण ढोबळे यांचे तिकीट कापले व रमेश कदम या अजित पवारांच्या धडाकेबाज समर्थकाला उमेदवारी दिली. आमदार झाले. सध्या ते आर्थर रोड तुरुंगातल्या कोठडीत तुरुंगाची हवा खात आहे. मोहोळ विधानसभा मतदारसंघात मराठा समाजाचे प्राबळ असल्याने शरद पवार सांगतील किंवा ठरवतील तो अनुसूचित जातीचा उमेदवार सहज निवडून जातो. मोहोळ विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव नसताना या मतदारसंघामधून सातत्याने मराठा समाजाचे उमेदवार निवडून आले आहेत. 1978 च्या विधानसभा निवडणुकीत इंदारा काँग्रेसचे शहाजीराव पाटील निवडून आले आहेत.

1978 च्या विधानसभा निवडणुकीत मोहोळ विधानसभा मतदारसंघांमधून शहाजीराव पाटील यांनी शेकापचे चंद्रकांत निंबाळकर यांचा पराभव केला होता तर 1980 च्या निवडणुकीत शेकापचे चंद्राकात निंबाळकर यांनी काँग्रेसचे शहाजीराव पाटील यांचा पराभव करून 1978 च्या पराभवाची परतफेड केली होती. 1995 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या शहाजीराव पाटील यांनी शेकापचे बाबुराव पाटील यांना पराभूत केले होते.1990 च्या निवडणुकीत शेकापच्या चंद्रकांत निंबाळकर यांनी पुन्हा काँग्रेसच्या शहाजी पाटील यांना पराभूत केले होते. 1995 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसच्या राजन पाटील यांनी शेकापच्या चंद्रकांत निंबाळकर यांचा दणदणीत प्रभाव केला होता.

1999 च्या मुदतपूर्व निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजन पाटील यांनी निवडणूक लढवली व त्यांनी पुन्हा शेकापचे चंद्रकांत पाटील यांचा दणदणीत पराभव केला. 2004 च्या निवडणुकीमध्ये शेकापचे चंद्रकांत निंबाळकर यांनी शिवसेनेत प्रवेश करून शिवसेनेच्या धनुष्यबाणावर निवडणूक लढवली असता राजन पाटील यांनी सतत तिसऱ्यांदा पराभव करून विजयाची हॅट्रिक साजरी केली होती अशा प्रकारे मोहोळ विधानसभा मतदारसंघ आमदारकी पाटील व निंबाळकर घराण्यात फिरत होती.
मोहोळ विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव झाला असता प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली असता ढोबळे यांनी अपक्ष उमेदवार नागनाथ दत्तात्रय क्षीरसागर यांचा 29179 मतांनी पराभव करून निवडून आले.शिवसेनेचे विद्यमान आमदार उत्तर सोलापूर उत्तम प्रकाश खंदारे त्यांना अवघी 961 मते मिळाली होती. आरपीआयचे गौतम किसन वाडगे ४३५२ मते बसपाचे विनोद कांबळे यांना 2383 मते ,भारिपचे अँड. पुरुषोत्तम नाईकनवरेना 533 मते मिळाली होती. किसन तात्या बनसोडे, संजय माणिक खिल्लारे, मल्हारी पाटोळे, लक्ष्मीकांत गायकवाड इत्यादी अपक्षानी निवडणूक लढवली.

त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रा. लक्ष्मण ढोबळे या मतदार मतदार संघात शरद पवारांच्या खद्या समर्थक ढोबळेनी बाजी मारली. निवडून आले व राज्य मंत्रिमंडळात समाज कल्याण खात्याचे मंत्रीही झाले होते.2014 च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे यांना डावलून अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाचे अध्यक्ष रमेश कदम यांना उमेदवारी बहाल केली. रमेश कदम यांना 62 हजार मते मिळाली. त्यानी भाजप उमेदवार संजय क्षीरसागर यांचा 54 हजार मते मिळाल्याने आठ हजार मताने पराभव केला. शिवसेनेचे मनोज शेजवळ यांना 40 हजार 42 मते पडली. विद्यमान आमदार व राज्याचे समाज कल्याण मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढविली असता त्यांना अवघ्या 12000 मतांवर समाधान मानावे लागले. गौतम खरात या काँग्रेसच्या उमेदवाराला केवळ आठ हजार मते मिळाली.


2009 मधील निवडणुकीत य मतदारसंघाच्या पुनर्रचनेत मोहोळ विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीचे रमेश कदम व लक्ष्मण ढोबळे हे दोघेही राष्ट्रवादीचे कट्टर समर्थक शिवाय एकाच मातंग समाजाचे, भाजपचे क्षीरसागर शिवसेनेचे मनोज शेजवळ काँग्रेसचे गौतम खरात व अपक्ष वाघमारे यांना मिळालेली 5000 मते या रिपब्लिकन आंबेडकरवादी मतांच्या विभागणीचा पुरेपूर फायदा रमेश कदम यांना मिळाला व ते केवळ आठ हजार मतांच्या आघाडीने निवडून आले. रिपब्लिकन आंबेडकरी जनतेने जर ठरवलं तर मोहोळ विधानसभा मतदारसंघातून आंबेडकरी विचारांचा आमदार सहज निवडून येऊ शकतो.

तानसेन ननावरे
8169218015

शब्दांकन
महादू पवार
पत्रकार मुंबई
9867906135

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!