
गुरुवारी रात्री एका जमावाने मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या वडिलोपार्जित घरावरच हल्ला केल्याची घटना घडली आहे. सुरक्षा दलामुळे जमावाचा प्रयत्न अयशस्वी ठरला, असं वृत्त टाईम्स ऑफ इंडियानं याबाबत वृत्त दिलं आहे.
पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, ‘मणिपूरमधील इंफाळच्या हिगांग भागातील मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या वडिलोपार्जित घरावर हल्ल्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. घरावर हल्ला करण्यासाठी निघालेल्या आंदोलकांना १००० मीटर आधीच रोखल्याचा पोलिसांना दावा केला आहे. या घरात कोणी नसून या घराची सुरक्षा वाढविल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मणिपूरमध्ये आक्रमक झालेल्या एका गटाने मुख्यमंत्री बिरेन सिंह यांच्या इंफाळ येथील वडिलोपार्जित घरावर हल्ला केल्याची घटना घडली. मात्र, आंदोलकांच्या हल्ल्यावेळी घरात कोणी नव्हतं. गुरुवारी रात्री ही घटना घडली आहे. आंदोलकांच्या हल्ल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी हवेत गोळीबार केल्याचाही माहिती आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत