सिद्धार्थ नगर येथे भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांना स्मृतिदिनी अभिवादन..

धाराशिव : रविवार दिनांक 10 मार्च रोजी सिद्धार्थ नगर सांजा रोड उस्मानाबाद येथे भारतीय बौद्ध महासभेच्या महिला शाखेच्या वतीने ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी शाखेच्या अध्यक्षा अशाताई रोकडे महिला उपाध्यक्षा कमलताई वाघमारे, पर्यटन प्रमुख पुष्पा गायकवाड, संस्कार विभाग प्रमुख आशा गायकवाड, पर्यटन सचिव रोहिणी वाघमारे, संस्कार सचिव अनिता गायकवाड, शाखा संघटक दीक्षा लांडगे, सुमन गायकवाड, कार्यालयीन सचिव आम्रपाली इंगळे, सदस्य कोमल सपकाळ इत्यादी पदाधिकाऱ्यांसह बौद्ध उपासक उपासिका या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रम प्रसंगी ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांनी महात्मा फुले यांना त्यांच्या कार्यामध्ये सातत्याने मोठे सहकार्य केले असे सहकार्य प्रत्येक महिलेने आपल्या कुटुंबासोबत राहून केले पाहिजे तसेच शिक्षणाशिवाय तरुण उपाय नाही शिक्षणाशिवाय प्रगती नाही म्हणून महिलांनी या क्षेत्रामध्ये येऊन विविध क्षेत्रात मोठी भरीव प्रगती केल्याचे दिसून येते आज भारताच्या राष्ट्रपती पासून ते विविध प्रशासकीय सेवेमध्ये महिलांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे हे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या कार्यामुळेच घडले असे आपल्या मनोगत मध्ये व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यानंद वाघमारे यांनी केले व सिद्धार्थ नगर मधील सर्व तरुण मंडळ उपासक उपासिका मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत