महाराष्ट्रमुख्यपानविचारपीठशैक्षणिक

रोज रोज विज्ञानाच्या आधारेच जगता.. पण जगण्याचे श्रेय अवैज्ञानिक देव-सुपरपॉवर-काल्पनिक शक्ती ला देता!

रोज रोज विज्ञानाच्या आधारेच जगता..
पण जगण्याचे श्रेय अवैज्ञानिक देव-सुपरपाॅवर-काल्पनिक शक्ती ला देता!
दिवसभर विज्ञानाने आखून दिलेली कामे करता..
काम संपल्यावर अवैज्ञानिक विधी-प्रार्थना-कर्मकांडे करत राहता!
मरण येऊ नये म्हणून साध्या साध्या दुखण्यावर वैज्ञानिक गोळ्या-औषधे घेता..
वर ‘देवामुळं तब्ब्येत बरी आहे’ असे अवैज्ञानिक फेकत राहता!
इंद्रियं बिघडली की विज्ञानाने तयार केलेला चष्मा, श्रवणयंत्र, व्हीलचेअर वगैरे वापरता..
‘देवाचा, अद्भुत शक्तीचा अनुभव आपलं नीट करतोय’ असे अवैज्ञानिक सांगत राहता..
विज्ञानाने तयार केलेल्या वाहनाने, हायवेने, एसी ने प्रवास करत झटकन हवे तेथे जाता..
देवाच्या कृपेने सुखरूप पोचलो असे अवैज्ञानिक बडबडत राहता!
विज्ञानाने सर्वसुखसोयीने बांधून दिलेल्या घरात राहता..
त्या परवरदिगारचे छत्र डोक्यावर आहे म्हणत अवैज्ञानिकपणे त्याच घरात डोकं टेकवून कृतज्ञता व्यक्त करता!
विज्ञानाने शोधून दिलेल्या वस्त्रांनी शरीर सुरक्षित ठेवता..
त्याला धर्मांचे रंग चिकटवून अवैज्ञानिक विचारांचा प्रसार करता!
तुमचा जन्म कसा झाला ते विज्ञानाकडून शिकता..
पण देवाच्या कृपेने जन्माला आलो म्हणता!
वैज्ञानिक पद्धत आणि नियम कोणते हे अजिबात माहिती करून घ्यायची इच्छा देखील दाखवत नसता..
पण आमच्या धर्मग्रंथात काय काय सांगितले आहे ते मात्र तासंतास धुंडाळत बसता!
विज्ञानाचे शोध लावणार्या एकाही वैज्ञानिकाबद्दल आभार देखील मानत नसता..
पण काल्पनिक आणि अस्तित्वात नसलेल्या देवाचे मोठमोठे पुतळे ऊभे करता!
मानवजात, पृथ्वी, कशी निर्माण झाली हे विज्ञानाने सांगितले आहे हे जाणता..
पण देवाने जग निर्माण केलेय हे रोज पुटपुटायचे चालूच ठेवता!
विज्ञान दिन साजरे करता..
नारळ फोडून, उदबत्ती पेटवून, हात जोडून किंवा आकाशाकडे करून विज्ञानाचाही धर्म करून सोडता!

अवैज्ञानिकता लपेटलेल्या सर्व धर्मातील देवदेव आणि स्वधर्माचा जयजयकार करणार्यांकडून विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाची रोज रोज कत्तल करणार्यांना समर्पित!!

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!