हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशन तर्फे मुंबई शिक्षक मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार शिक्षणमहर्षी मा. श्री.ज.मो. अभ्यंकर साहेब यांचा सत्कार!
जूनी पेन्शनसह खाजगी शाळेतील शिक्षकांच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा!
छत्रपती संभाजीनगर: हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनचे राज्य प्रवक्ता शेख अब्दुल रहीम सर यांनी काल रात्री 9 वाजेच्या सुमारास सुभेदारी गेस्ट हाऊसवर (मांजरा) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले मुंबई शिक्षक मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार शिक्षणमहर्षी मा. श्री.ज.मो. अभ्यंकर साहेब यांची भेट घेतली तसेच प्रथमतः हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनतर्फे परंपरेनुसार पुष्पगुच्छ न देता पुस्तक अणि शाल देऊन सत्कार करण्यात आले. तसेच जुनी पेन्शनसह खागजी शाळेतील विद्यार्थी-शिक्षकांच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. हॅप्पी टू हेल्प फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख अब्दुल रहीम सरांनी आपले मनोगत व्यक्त केलं की, विद्यार्थी-शिक्षकांच्या आशा वाढल्या आहेत. आपण शिक्षण विभागाचे अनेक पदे भूषविलेली आहेत याचा फायदा शिक्षक आमदार म्हणून विद्यार्थी-शिक्षकांना नक्की होईल असे प्रतिपादन केले. यावेळी आमचे स्नेही मार्गदर्शक तसेच भावी आमदार मा. डॉ. गफ्फर कादरी साहेब यांचीही उपस्थिती होती…
Congratulations #सत्कार आपुलकीचा🌹
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा
तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत