मुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

गॅस सिलिंडर वापरताना दक्षता महत्त्वाची; अशी घ्या काळजी.

एलपीजी गॅस सिलिंडर नेहमी अधिकृत विक्रेत्यांकडून आयएसआय मार्क असलेल्या एलपीजी सिलिंडरचा वापर करा.
वितरणाच्या वेळी गॅस सिलिंडर स्वीकारताना, सिलिंडर योग्यरित्या सील केली जाते आणि त्याची सुरक्षा कॅप छेडछाड केलेली नाही याची खात्री करा, ज्यामुळे एलपीजीची गळती होऊन मोठ्या प्रमाणात विस्फोट होऊ शकतो, अशा महत्त्वपूर्ण टिप्स भारत पेट्रोलियमचे अधिकारी कमलेशकुमार यांनी पारोळा येथील कार्यशाळेत दिल्या.

किसान कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय पारोळा येथे भारत पेट्रोलियम भारत सरकार, मानस गॅस एजन्सी, तामसवाडी आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग किसान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी भारत पेट्रोलियमचे अधिकारी कमलेशकुमार आणि पवन भारती हे उपस्थित होते. यावेळी कमलेश कुमार यांनी एलपीजी गॅस सिलिंडर व त्याच्या घरगुती वापरामुळे अपघात कसे होतात, याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले, की गॅस वापरणे जितके सहज तितकेच त्याच्यापासून अपघात सुद्धा जास्त होऊ शकतात. त्यामुळे गॅस सिलिंडरसोबत खेळ करू नका, कोणत्याही कारणाने गॅस बाहेर आल्यास त्याचा वेग हा २५० पट असतो. त्यामुळे अपघाताची शक्यता व त्यामुळे होणारे नुकसान हे अधिक असते.

गॅस सिलिंडरमध्ये एलपीजी वायू हा दोन टक्के आणि हवा ९८ टक्के असते. त्यामुळे रात्री झोपताना रेग्युलेटर बंद करणे आवश्यक आहे. जर रेग्युलेटर बंद केले नाही, तर गॅस हळूहळू लिक होतो. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी स्वयंसेवकांना केले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!