राष्ट्रपतींच्या हस्ते होणार राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं वितरण…

कला आणि संस्कृती,शौर्य,नवोन्मेष,समाजसेवा आणि क्रीडा क्षेत्रात केलेल्या लक्षणीय कामगिरीबद्दल,देशभरातून निवडलेल्या १९ मुलांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार,२०२४ चं वितरण करण्यात येणार आहे. पुरस्कार विजेत्यांमध्ये १८राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील नऊ मुले आणि दहा मुलींचा समावेश आहे.केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी तसंच महिला आणि बालविकास राज्यमंत्री मुंजपारा महेंद्रभाई या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. ही मुले २६ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या संचालानातही सहभागी होणार आहेत.उद्या,२३ जानेवारी रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधतील.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत