महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकणसामाजिक / सांस्कृतिक

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील काव्यरचनेचा सर्व भाषिक ‘विश्वकाव्य दर्शन’ हा’बार्टी’ मार्फत राबविला जात असलेला महाप्रकल्प

प्रिय कवी बंधू-भगिनींनो
सस्नेह जयभीम,
विषय: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील काव्यरचनेचा सर्व भाषिक ‘विश्वकाव्य दर्शन’ हा
‘बार्टी’ मार्फत राबविला जात असलेला महाप्रकल्प.
प्रिय कवी बंधू आणि भगिनींनो,
सस्नेह जय भीम,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था – बार्टी, पुणे यांच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तुत्वाला कवेत घेणाऱ्या सर्व भाषिक कवितांचे संग्रह प्रकाशित करण्याचा महाप्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
या प्रकल्पाची जबाबदारी माझ्यावर टाकली असल्याचे वृत्त आपल्याला समाज माध्यमे व वर्तमानपत्राद्वारे कळले असेलच.
यासंदर्भात कळविण्यात येते की, या स्वरचित कविता पूर्वप्रकाशित असाव्यात. त्यांचे पूर्वप्रकाशन कोणत्या नियतकालिकात, पुस्तकात कधी झाले आहे याच्या माहितीसह केवळ ईमेलवर पाठवाव्यात. व्हाट्सअँप वरील कविता स्वीकारल्या जाणार नाहीत. जगभरातून कवितांचा ओघ सुरू झाल्याने असा निर्णय घेण्यात आला आहे. यापुढे आपण jvpawar1944@gmail.com या इमेल वर कविता पाठवाव्यात व आपल्या सहकाऱ्यांनाही कविता पाठवण्यासाठी हा नवीन ईमेल आयडी द्यावा.
इमेलवर कविता पाठवताना Subject मध्ये – महामानव विश्वकाव्य दर्शन असा स्पष्ट उल्लेख करावा.

     ज. वि. पवार

9833961721 (jvpawar1944@gmail.com)

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!