सिद्धार्थ काॅलेज २०–६–४६

अशोक तुळशीराम भवरे
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शैक्षणिक महत्त्व जाणले होते म्हणून आपल्या समाजातील सर्व मुले, मुलींना मोफत व दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून १९४६ रोजी मुंबईत सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली तर १९५० ला औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेज सुरू केलें.
तुमच्या प्रिन्सिपाॅल साहेबांनी आताच तुम्हाला सांगितले की आमचे
सिद्धार्थ काॅलेज अद्यापि बाल्यवस्थेत असल्याने त्याला आपली
परंपरा अद्यापि प्रस्थापित करावयाची आहे त्यामुळे मला व्याख्यान देण्यासाठी तुम्ही दिलेल्या या संधीचा फायदा घेऊन आमच्या काॅलेजची
परंपरा याविषयावरच मी आता बोलणार आहे परंतु माझे प्रत्यक्ष
व्याख्यान सुरु होण्यापूर्वीला मला
आजकालच्या विद्यार्थ्यांना दोन
शब्द सांगावयाचे आहेत १९३७सालापासून माझा विद्यार्थ्यांशी
असलेल्या संबंध तुटला आणि तेव्हापासून. मी प्राध्यापकाचा पेशा
बाजुला ठेवून राजकारणाचा पेशा पत्करला कित्येक काॅलेजात व्याख्यान
देण्यासाठी मला निमंत्रणे येतात पण
त्याचे निमंत्रण स्वीकारायचे नाही
असा मी मनाशी निश्चय केला आहे
सिद्धार्थ काॅलेज हा त्याला एकच अपवाद आहे सिद्धार्थ काॅलेजने आपली परंपरा कशी प्रस्थापित करावयाची हे मी आता तुम्हाला सांगतो आमच्या काॅलेजचे नाव सिद्धार्थ काॅलेज असे आहे.ते का ठेवले
गेले?
मी जर एखाद्या कोट्याधीशाला
शब्द टाकला असता तर मला.
काही लाख रूपये सहज मिळवता
आले असते तसे केल्याने मला त्या
काॅलेजला त्या कोट्याधीशाचे नाव
द्यावे लागले असते पण मी तसा विचार केला नाही व या काॅलेजला
“सिद्धार्थ काॅलेज” हेच नाव द्यावे असा
मी विचार केला हे बुद्धाचे आहे हे तर
तुम्हाला माहीतच आहे त्याचप्रमाणे हे आमचे सिद्धार्थ काॅलेज अद्यापि
छोटेसे बालक आहे त्याला अद्यापि
नऊ महिने सुद्धा झाले नाहीत. ह्या काॅलेजने अद्यापि आपली परंपरा प्रस्थापित केली नसेल तर त्याचे मला
मुळीच आश्चर्य वाटत नाही पण तेवढ्यावरून आमच्या या छोटया
सिद्धार्थ काॅलेजपुढे काही ध्येय नाही
अशी मात्र तुम्ही आपली समजूत करून घेऊ नका . त्या ध्येयामुळेच
ह्या काॅलेजला सिद्धार्थ काॅलेज असे
नाव देण्यात आलेले आहे हे लक्षात
ठेवा. बुद्धांच्या नावाने हे काॅलेज का
प्रस्थापित करण्यात आले ? बुद्धांनीच
हे ध्येय आपल्यासमोर ब्रह्यजालसुत्रात सांगून ठेवले आहे
म्हणुनच बाबासाहेबांनी गौतम बुद्धांचे नांव दिले
डॉ बाबासाहेब आंबेडकर
माझी आत्मकथा
पान नंबर ११५–११६
जयभीम नमोबुद्धाय जयभीम
,संदेश प्रसारक
अशोक तुळशीराम भवरे सिडको, नांदेड
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत