ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटिक्स


भारतीय संविधानाने अंगीकारलेल्या संसदीय प्रणालीतील केंद्रीय आणि प्रांतीय कायदेमंडळातील प्रतिनिधींचे व्यक्तिमत्व शील आणि प्रज्ञायुक्त असावे अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मनोमन ईछा होती. या संदर्भात 23 नोव्हेंबर 1950 रोजी त्यांनी संसदेत केलेल्या भाषणात आपले विचार व्यक्त केले आहेत.
" संसदीय संस्थेमध्ये सभागृहाला आपल्या सौम्य आणि तीक्ष्ण तर्कशुध्द आणि माहितीपूर्ण भाषणाने जो सभासद भारून टाकू शकतो तोच सभासद यशस्वी होऊ शकतो."
संसदीय वक्तृत्वा बद्दल बाबासाहेबांनी काढलेले हे उद्द्गार त्यांनी आपल्या संसदीय कारकिर्दीमध्ये सार्थ करून दाखविले. कोणत्याही संसदीय संस्थेत निवडून गेलेला प्रतिनिधी हा कार्यक्षम असला पाहिजे. लोकांना जे प्रश्न भेडसावतात ते सोडविण्याचे सामर्थ्य आणि विचारशक्ती ह्यांची त्याने प्राप्ती केली पाहिजे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या जाणिवेने आपल्या जीवनाच्या अखेरच्या पर्वात मुंबईत 1 जुलै 1956 पासून संसदीय शिक्षण देणारी एक आदर्श संस्था *”ट्रेनिंग स्कूल फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटिक्स ” स्थापन केली होती.
यामध्ये राजकारण ,अर्थशास्त्र ,अंदाजपत्रक ,कामगार संघटना , संसदीय कामकाजविषयक नियम आणि परंपरा इत्यादी आवश्यक विषयांबरोबर वक्तृत्व साधनेला प्राधान्य दिले होते.
स्वतः बाबासाहेब या संस्थेचे संचालक होते.
डिसेंबर 1956 मध्ये वक्तृत्वावर व्याख्याने देण्याचे त्यांनी निश्चित केले होते.
दुर्दैवाने त्यांच्या आकस्मात परिनिर्वाणाने एका प्रभावी वक्त्याच्या मार्गदर्शनाला ही संस्था आणि तिचे उत्सुक विद्यार्थी मुकले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना केवळ कार्यकर्ता वर्ग तयार करायचा नव्हता तर या देशाला सक्षम नेतृत्व देणारे आदर्शवत लीडर्स निर्माण करायचे होते.
यादेशातील मतदाराला या अभ्यासातून जाणीव झाली पाहिजे की , मी जे माझे मत देणार आहे तो नेता खरोखर योग्य लीडर आहे का ?
म्हणून जागरूक मतदारांसाठी आणि शाशन प्रशासन व्यवस्थेतील नेतृत्वासाठी हा अभ्यासक्रम एक उत्तम संधी आहे.
तेव्हा आदरणीय / सन्माननिय
बंधू आणि भगिनींनो. .. ..
शासन आणि प्रशासन व्यवस्थेत चांगले,अभ्यासू ,गुणवान ,शिलवान ,
नीतीवान असे सर्वगुणसंपन्न नेतृत्व घडवण्यासाठी school for entrance to politics हे Training School School डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल ॲण्ड एज्युकेशनल रिसर्च इन्स्टिट्यूट, या संस्थेच्या माध्यमातून रविवार दिनांक ०७.०१.२०२४ पासून राजकारणातील प्रवेशासाठी प्रशिक्षण (ट्रेनिंग फॉर एन्ट्रन्स टू पॉलिटिक्स) हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम पुन्हा सुरू करण्यात आला आहे. अभ्यासक्रामाचा कालावधी सहा ते सात महिन्यांचा आहे. अभ्यासक्रमाचे वर्ग महिन्याच्या प्रत्येक पहिल्या रविवारी, सकाळी १०.३० ते सायं. ५.३० असणार आहे.
दि.१६.०६.२०२४ रोजी, अभ्यासक्रमाचे १२ वे लेक्चर होणार आहे.
या एकूण अभ्यासक्रमात नेतृत्व विकास, संघटन कौशल्य, संघटना वृद्धी,भारतीय राज्यघटना, लोकशाही, संसदीय कामकाज, अंदाजपत्रक, निवडणूक प्रक्रिया, पंचायत राज व्यवस्था, विविध महत्त्वाचे कायदे, आंतरराष्ट्रीय संबंध, आंतरराष्ट्रीय संघटना, लोकसंख्या शास्त्र, मानसशास्त्र, अर्थशास्त्र, प्रसार माध्यम, युद्धनीती,, कामगार संघटना,बुद्ध आणि त्यांचा धम्म, बुद्ध की कार्ल मार्क्स, सर्वधर्मांचा तौलनिक अभ्यास,संशोधन पद्धती इत्यादी आवश्यक विषय शिकवले जातील.
अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी व अधिक माहितीसाठी आपण खालील दिलेल्या क्रमांकावर संपर्क करू शकता. अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण शुल्क रू. २००/- असेल.( यामध्ये एक वेळेचे जेवण, दोन वेळेचा चहा पाणी व इतर खर्चाचा समावेश आहे.)शुल्क प्रत्येक प्रशिक्षण वर्गाच्या दिवशी आकारले जाईल.
संपर्क :
प्रा. प्रेमरत्न चौकेकर – 9757088520
डॉ बापूराव बनसोडे – 9920223796
आयु. अमोलकुमार बोधीराज – 8108805277
राकेश खैरे – 7276816055
स्थळ : डॉ बाबासाहेब आंबेडकर सोशल ॲण्ड
एज्युकेशनल रिसर्च इन्स्टिट्यूट,
डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन,
डॉ बाबासाहेब आंबेडकर गार्डन,
सेक्टर -9, शबरी हॉटेलच्या मागे,
वाशी, नवी मुंबई.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत