मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

सुप्रसिध्द कलारत्न प्रा. गणेश चंदनशिवे सर यांची आनंद बुध्द विहार हडको तुळजापूर येथे सदिच्छा भेट

धाराशिव ता. 17 : आज रोजी मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख, सुप्रसिध्द सिने आर्टिस्ट, अप्रतिम गायक, धारदार बुलंद आवाजाचे धनी, लोक संगीताच्या माध्यमातून प्रबोधनाची चळवळ चालवणारे आयु. प्रा. गणेश चंदनशिवे सर यांनी आवर्जून आनंद बुध्द विहार हडको तुळजापूर येथे भेट दिली.

तुळजापूर नगरीत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स येथे नियोजित कार्यक्रमासाठी चंदनशिवे सरांचे आगमन झाले होते.

सोबत नवोदित कलाकारांचा उत्साह वाढविणारे आयु. प्रा. संदीप पाटील सर, प्रबोधनाचा तरुण चेहरा प्रतिभावान भारुडकार कृष्णाई उळेकर ताई, आपल्या भारदस्त आवाजाने छत्रपतींचा उज्वल इतिहास डोळ्यासमोर उभा करणारे शिवशाहीर यशवंत जाधव साहेब यांचीही उपस्थिती होती.

आदर्शाचे पूजन करून सर्वांनी मनसोक्त गप्पा मारल्या. सहज बोलतानाही चंदनशिवे सरांनी भीमगीते, जलसे, आंबेडकरी चळवळ यांच्याबद्दल चे मजेदार किस्से सांगितले.

आनंद बुध्द विहार, भारतीय बौद्ध महासभा, वंचित बहुजन आघाडी, रिपाई, धम्मरत्न देविदासराव कदम सोशल फाउंडेशन व तुळजापूर येथील समाज बांधवांच्या वतीने आयु. जीवन कदम, प्रा. डॉ. शिवाजी जेटीथोर, आयु. सुकेशन ढेपे, आयु. सुरेंद्र कदम, आयु. लक्ष्मीताई कदम, स्वातीताई शहाजी कदम यांनी पंचशील पताका पुष्पगुच्छ देऊन प्रा गणेश चंदनशिवे सर व त्यांच्या संपूर्ण टीम चा सत्कार केला.

जय भीम ????????

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!