मुंबई सह महाराष्ट्रातील 13 ठिकाणी आज मतदान
पाचव्या टप्प्यात देशात 49 ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडणार

महाराष्ट्र राज्याने लोकसभा 2024 च्या निवडणुकी चा शेवटचा टप्पा गाठला असून पाचव्या टप्प्यासाठी आज मतदान होणार आहे.
देशातील 49 जांगासह महाराष्ट्रातील 13 मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. महाराष्ट्रात नाशिक, धुळे, दिंडोरी, पालघर, ठाणे, कल्याण, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई आणि दक्षिण मुंबई या मतदारसंघाचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार आहे.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी तर आहेच पण सर्व देशाच लक्ष मुंबई तील घडामोडींकडे लागलेले असते. त्यामुळे मुंबई मधून कोण कोण लोकसभेवर जाणार याची सर्वांना उत्सुकता आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटी मुळे सुध्धा बऱ्याच जणांसाठी ही निवडणूक अस्मितेची बनली आहे.
जास्तीत जास्त संख्येने मतदारांनी या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे ही दैनिक जागृत भारत परिवाराच्या वतीने आवाहन.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत