महाराष्ट्रमुख्यपानमुंबई/कोंकण

बुद्ध विहारांतून धम्म धारणेला पोषक आणि पुरक कार्यक्रमांचे आयोजन करा !-प्रा. आनंद देवडेकर


गुहागर दि. १६ मे
बुद्ध विहारे उभारणाऱ्या संस्था संघटनांना बुद्ध विहारांतून बौद्ध धम्म संवर्धन आणि जतन करण्याची फार मोठी जबाबदारी पार पाडावयाची आहे याचं भान ठेवून अशा संस्था संघटनांनी बुद्ध विहारांतून धम्म धारणेला पोषक आणि पुरक कार्यक्रमांचे आयोजन करायला हवे, असे प्रतिपादन अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे केंद्रीय कार्याध्यक्ष सद्धम्मकार प्रा. आनंद देवडेकर यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यात कोतळूक येथे केले.
कोतळूक गावातील राजगृह बुद्ध विहाराचा प्रथम वर्धापन दिन व डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त आयोजित प्रबोधन सत्रात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. देवडेकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयु. शंकर काळू मोहिते हे होते.
अत्यंत परखड शब्दांत बौद्ध समाजातील उणीवा आणि दोष दाखवून देत प्रा. आनंद देवडेकर आपल्या अनुभवसंपन्न भाषणात पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या शुद्ध स्वरूपातील बौद्ध धम्मात मनमानीपणे बहुजनवादाची भेसळ करू नका. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, चक्रवर्ती सम्राट अशोक जयंती, बुद्ध जयंती व धम्मचक्र प्रवर्तन दिन हे दिवस बौद्ध समाजाने सण म्हणून साजरे करायला हवेत ते करताना या जयंती सोबत इतर कोणाही महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी न करता हे दिवस केवळ बौद्ध धम्म संवर्धनासाठीचे सण म्हणून स्वतंत्रपणे साजरे व्हायला हवेत असेही प्रा. देवडेकर आपल्या भाषणात म्हणाले.
बौद्धजन सहकारी संघ शाखा क्रं ३७ कोतळुक मुंबई व गाव, विक्रमशीला युवा संघ व माता रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामस्थांच्या भरगच्च उपस्थितीत अत्यंत उत्साहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास कोतळुक गावच्या सरपंच प्रगती प्रकाश मोहिते, पोलीस पाटील संचिता संदिप मोहिते, मुंबई शाखेचे अध्यक्ष आयु. दीपक हि. मोहिते, चिटणीस विजय मोहिते, अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष आयु. संजय गमरे, सुरेश जाधव, संजय मोहिते आदी मान्यवर उपस्थित होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!