EVM च्या सेटिंग साठी ऑफर; आर्थिक गुन्हे शाखेच्या पथका कडून सापळा रचून अटक.

छत्रपती संभाजीनगर: लोकसभा 2024 या ना त्या कारणाने गाजत आहे. EVM बद्दल जनतेच्या मनातील संभ्रमा चा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास काल येथे अटक करण्यात आली.
इव्हीएम मशीनला विशिष्ट प्रकारची चिप बसवून आपल्या उमेदवारास जास्तीचे मतदान करून देण्याच्या येईल अशी खात्री देत अडीच कोटी रूपयांची मागणी करून फसवणूक करणाऱ्यास आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे.
मारोती नाथा ढाकणे (४२) असे या संशयित आरोपीचे नाव असून तो लष्करात हवालदार पदावर कार्यरत असल्याचे समोर येत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना आरोपीने आमिष दाखविण्याचा प्रयत्न केला असता दानवे यांनी याबाबत पोलिसांकडे लेखी तक्रार केली. यानंतर ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मारोती ढाकणे याने ईव्हीएम हॅक करून देतो. त्यासाठी अडीच कोटी रुपये द्यावे लागतील, अशी मागणी विरोधी पक्षनेते दानवे यांच्याशी मोबाइलद्वारे संपर्क साधून केली. याबाबत दानवे यांनी पोलीस आयुक्तांना पत्राद्वारे कळवत तक्रार दिली. प्रकरणाचे गांभीय लक्षात घेत पोलीस आयुक्त मनोज लोहिया यांनी तात्काळ आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांच्या नेतृत्वात विशेष पथक नेमत कारवाईचे निर्देश दिले. विरोदी पक्षनेते अंबादास दानवे यांचे भाऊ राजेंद्र दानवे हे पथकासह रवाना झाले.
तसेच मोबाईलवर संभाषणात ठरल्याप्रमाणे अडीच कोटी रूपयांपैकी तडजोडीअंती दीड कोटी रुपयांची मागणी करत टोकन रक्कम म्हणून एक लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर दानवे यांच्याकडून एक लाखाची रक्कम स्विकारतानाच दबा धरुन बसलेल्या पथकाने मारोती ढाकणे याच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत