मराठवाडामहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

संत गाडगे महाराज यांची जयंती आनंद बुध्द विहार हडको तुळजापूर येथे साजरी..

धाराशिव : स्वच्छता, शिक्षण व साधेपणाचे महत्व आपल्या कीर्तनातून व वागणुकीतून लोकांना पटवून देणारे, थोर कीर्तनकार संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त आनंद बुध्द विहार हडको तुळजापूर येथे वंदनेचा कार्यक्रम घेण्यात आला.

कार्यक्रमाला तुळजापूर तालु का समता सैनिक व महिला विभाग उपाध्यक्ष लक्ष्मीताई महेश कदम, TISS येथील आयु. शकुंतला ताई जारे, आयु अजय रोहिते, विजय कांबळे, शोभाताई शिंदे व विहारात दररोज येणारी मुले मुली उपस्थित होते.

वंदनेच्या आधी विहारा चा परिसर स्वच्छ करून संत गाडगे महाराजां ना कृतीतून अभिवादन करण्यात आले व नंतर प्रतिमांना पुष्प धूप दीप प्रज्वलन करून वंदना घेण्यात आली.

लहान थोर सर्वांनी स्वच्छता व वंदनेत सहभाग नोंदविला. आयु. संभव पगारे यांनी संत गाडगे महाराज यांच्या जीवनावर सुंदर असे भाषण केले.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!