मनुच्या पालखीचे …

कुणी आतून दलाल, कुणी बाहेरून दलाल //
मनुच्या पालखीचे , कसे झाले हे हमाल //धृ०//
जळतंय संविधान //
त्याचं ना घेणं देणं //
हा कसला स्वाभिमान, कसली ही कमाल //१//
जळतंय त्याला कळतं //
कोण कुठं कसं मळतं //
ही कसली चाल आहे, हा काय गोलमाल //२//
दिसे झाकलेली मूठ //
हे मूरतं पाणी कुठं //
उगी का स्वागताला , हे टाकती रूमाल //३//
बोलू नकाच कोणी //
तुमची गुलाम वाणी //
म्हणतात गाढवांनी, करू नये सवाल //४//
म्हणे कुणी अंध भक्त //
आहे खानदानी रक्त //
नेता जलाल असला, कुणी आहे जहाल //५//
आदिनाथ इंगोले, नांदेड .
संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत