दिन विशेषदेशप.महाराष्ट्रमहाराष्ट्रमुख्यपानसामाजिक / सांस्कृतिक

भीमा कोरेगाव 1 जानेवारी संदर्भात पोलीस प्रशासन व समतासैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा यांची संयुक्त बैठक संपन्न

पुणे -दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया व समता सैनिक दल 1 जानेवारी शौर्य दिन भीमा कोरेगाव* संदर्भात समता सैनिक दलाचे चे महत्वपूर्ण अधिकाऱ्यांची बैठक लोणीकंद पोलीस स्टेशन पुणे येथे दि. 24/12/2024 सायंकाळी डिसिपी हिम्मत जाधव, पोलीस प्रशासन व भारतीय बौद्ध महासभेचे स्टाफ ऑफिसर, राष्ट्रीय उपाध्यक्ष ऍड एस के भंडारे सर यांच्या मध्ये चर्चा संपन्न झाली यामध्ये 31 डिसेंबर 2024 व 1 जानेवारी 2025 भिमा कोरेगाव हा राष्ट्रीय कार्यक्रम संस्थेचे ट्रस्टी राष्ट्रीय कार्याधक्ष्य आद डॉ भीमरावसाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अंतर्गत 6 डिसेंबर दादर चैत्याभूमी प्रमाणे 1 जानेवारी भिमा कोरेगाव येथे पुणे च्या सर्व जिल्हा शाखा व महाराष्ट्रातून सुमारे 1000 समता सैनिक दलाचे सैनिक व अधिकारी ड्युटी देऊन येणाऱ्या भीम अनुयायांचे सेवा व अभिवादन यावर्षी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पोलीस प्रशासनाने काही सूचना मांडल्या व ऍडव्होकेट एस के भंडारे सर त्यावर सूचना मांडल्या संस्थेचे नियोजन स्थानिक व्यवस्थापन भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा पूर्व शाखा करते.सैनिक ड्युटी, सभेच्या जागेवषयी पूर्व नियोजित कार्यक्रम, रोटेशन पद्धतीने सैनिक सेवा देणे, पार्किंग व्यवस्थापन, संस्थेकडून त्यांना देण्यात येणारे ड्युटी कार्ड, ड्युटी आदेश, व्ही आय पी नियोजन, पोलीस प्रशासनासोबत समता सैनिक दलाचे अधिकारी व सैनिक यांच्यात समन्वय असेल अश्या विषयावर चर्चा झाली दलाचे यावेळी लोणीकंद पोलीस स्टेशन चे पीएस आय कुंभार सर, इतर अधिकारी होते तसेच लेफ्टनंट जनरल पि एस ढोबले , पुणे जिल्हा पूर्व चे, सरचिटणीस मेजर राजरत्न थोरात,कोषध्यक्ष संतोष आरवडे, मेजर सुभाष कांबळे, पुणे पूर्व चे कार्या सचिव अशोक शिंदे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

संपूर्ण महाराष्ट्रातील घडामोडी व ताज्या बातम्या तसेच जॉब्स/शैक्षणिक/ चालू घडामोडीवरील वैचारिक लेख त्वरित जाणून घेण्यासाठी आमच्या व्हाट्सअँप चॅनलला Free जॉईन होण्यासाठी या लिंकला क्लीक करा

तसेच खालील वेबसाईटवर Click करा
दैनिक जागृत भारत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: कृपया बातमी share करा Copy नको !!